जुळ्या बहिणींना मिळाले जुळे गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • जीवनात सुरू असलेल्या या जोडी स्वरूपाचा योगायोग हा आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवरही सारखाच आला आहे. 
  •  साक्षी ही देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये दहावीत होती, तर प्रणाली ही नूतन विद्यालयात दहावीतच शिकत होती.
  • जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अपघातावर मात करिता आपले दहावीचे शिक्षण सुरू ठेवले.

किनगावराजा : जन्मत: जुळे मुले असले का त्यांच्या बहुतांश गोष्टी या सारख्याच असाव्यात असा प्रयत्न पालकांकडून करण्यात येतो. जन्मात काही मिनिटांचे अंतर असलेल्या या मुलांच्या आयुष्यात मात्र, पालकांच्या प्रेमातील अंतर कमी होऊ नये यासाठी लहानपणापासून तर ते मोठे होईपर्यंत खूप तडजोड करावी लागते. जीवनात सुरू असलेल्या या जोडी स्वरूपाचा
योगायोग हा आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवरही सारखाच आला आहे. दहावी परीक्षेत जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींची शाळा ही वेगवेगळी असूनही हा अफलातून योग घडला आहे.

येथील जुळ्या बहिणी इयत्ता 10 वीत वेगवेगळ्या शाळेत शिक्षक घेतात. परंतु, त्यांनी दिलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेत (10 वीच) सारखे गुण मिळविले असून हा एक अफलातून योग असल्याचे ठरत असून याची परिसरात सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. गावातील प्रणाली सुधाकर झोरे व साक्षी सुधाकर झोरे या जुळ्या भगिनी आहे. साक्षी ही देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये दहावीत होती, तर प्रणाली ही नूतन विद्यालयात दहावीतच शिकत होती. त्यांनी मार्च 2019 मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 ची परीक्षा सोबतच दिली. त्याचे वडील सुधाकर झोरे व आई गोदावरी झोरे हे पेशाने शिक्षक आहे. सुरवातीला दोघी देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये सोबतच शिकत होत्या परंतु प्रणालीचा अपघात झाल्याने तिने किनगाव राजा येथीलच नूतन विद्यालयात प्रवेश घेतला. 

जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अपघातावर मात करिता आपले दहावीचे शिक्षण सुरू ठेवले. नुकताच लागलेला दहावीचा निकाल मात्र या दोघी जुळ्या बहिणींकरीता अभूतपूर्व व अफलातून असा योग ठरला. दोघींनाही समसमान असे 93.60 टक्के गुण मिळाले. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्त असलेल्या प्रणालीने नूतन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या यशाचे परिसरात एकच चर्चा सुरू असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News