परीक्षा यूपीएससीची पण एसटी विभाग संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020

परीक्षा यूपीएससीची पण एसटी विभाग संभ्रमात

परीक्षा यूपीएससीची पण एसटी विभाग संभ्रमात

कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यातर काही परीक्षा टप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु परीक्षांना अधिक उशीर होऊ लागल्याने राज्य आणि केंद्र सरकारकडून संपुर्ण काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहे.  

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ४ ऑक्टोबर २०२० रोजी सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा २०२० आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी एसटी सेवा देण्यात येणार आहे. मुंबईच्या ३८ उपकेंद्रात ही परीक्षा होणार असून प्रत्येक जिल्ह्यात एसटीचं आयोजन करण्यात येणार आहे. तशी सुचना एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना केली आहे. पण नागपूरात केंद्र असतानाही ही सुचना केली नसल्याने अधिकारी संभ्रमात असल्याचं चित्र आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षेसाठी ३८ उपकेंद्रांसह नवी मुंबई आणि नागपुरातही उपकेंद्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. राज्यभरातून मुंबईत विद्यार्थी येणार असल्याने एसटी महामंडळाने राज्यातल्या सर्व नियंत्रक विभागाना बसच्या नियोजनाबाबत सुचना केली आहे. परंतु नागपूर केंद्रात परीक्षेसाठी विद्यार्थी जाणार असल्याने तेथील कार्यालयाला काहीचं कळवलेले नाही. त्यामुळे नागपूरच्या कार्यालयाला का सुचना केली नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबईला परीक्षेसाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी बसच्या फे-यांचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु नागपूर केंद्राबाबत आदेशात काहीच नमूद नसल्याचे नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News