कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा

महेश घोलप
Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा

कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्राचे वाजले बारा

महाराष्ट्रात पर्यनट व्यवसायात प्रगती व्हावी या हेतुने अनेक चांगले प्रकल्प राबिवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्याने लोकांशी संवाद साधून अनेक प्रकल्पांचीयोजना आखली. आखलेली योजना यशस्वी व्हावी हा हेतू राज्य सरकारचा होता. पर्यटन क्षेत्रामुळे राज्याचा अधिक विकास होतो. राज्यात अनेक किल्ले, डोंगररांगा, धरणक्षेत्र, अभयारण्य अशा परिसरात लोक यावीत यासाठी अनेक योजना आखल्या. काही ठिकाणी यश आलं, तर काही ठिकाण जैसे थे आहेत. त्या मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणाात झाला आणि सगळं कोलमडून गेलं. कारण राज्य सरकारच्या नियमावली नुसार पर्यटन क्षेत्रात जाण्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच पर्यटन क्षेत्रात असलेली दुकाने किंवा इतर साधनसामुग्री मिळणारी दुकाने अजूनही बंद आहे.

भारतात इतर देशातून कोरोनाचा शिरकाव झाला, त्यानंतर देशाने पर्यटन क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, तसेच देवस्थान अशी प्रादुर्भाव ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचा परिणाम देशाच्या अर्थकारणावरती झाला आहे. ज्यांनी छोटेमोठे व्यवसाय होते. त्यांचं कंबरडं पहिल्या पंधरा दिवसात मोडलं. पर्यटन क्षेत्राच्या परिसरात अधिक तरूण आपले व्यवसाय चालवत असतात. ते बंद झाल्याने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. काही तरूणांनी आम्हाला काहीतरी शासनाकडून मदत मिळावी अन्यथा पर्यटन तरी सुरू करा अशी मागणी केली होती.

आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात जाऊ, हा तालुका मुळात कोकणात मोडतो. कारण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, हिवाळ्यात मो्ठ्या प्रमाणात थंडी, उन्हाळ्यात रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन असं तिथलं वातावरण. कोकणात मोडतं असल्यामुळे जंगल परिसर, कोल्हापूरातील मुख्य शहरापासून ६० किलोमीटर अंतरावरती असलेला हा तालुका, डोंगराळ भाग उद्योग धंद्याची कमतरता आणि शेती करावी लागत असल्यामुळे भागातील तरूण ममंडळी शिक्षण पुर्ण करताचं शहरात नोकरीसाठी निघून जाते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतीचा अधिक भाग हिरवागार असतो. त्यामुळे ज्याचं शिक्षण कमी तो तरूण गावाकडं राहून शेती करतो.

शाहुवाडी तालुक्यात कांडवण नावाचं गाव आहे, तिथं शेतीला पुरक असं धरण बांधण्यात आलं आहे. हे धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एका टोकावरती आहे. कांडगावाच्या डोंगराच्या कुशीत असलेलं हे धरण. या धरणामुळे शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांचा पाण्याचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. धरणातील पाणी कानसा नदीत सोडलं जातं. ही कानसा नदी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरती असलेल्या वारणा नदीला मिळते. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्याने काणसा नदीला काय स्वरूपी पाणी असते.

अनेक वर्षांपासून धरण तिथं धरण आहे. अनेकदा राज्य सरकारकडून तिथं निधी वापरून त्याची डागडुजी केली आहे. तो परिसर कोकणात मोडतं असल्यामुळे तिथं नेहमी पर्यटक असायचे. तिथल्या काही तरूणांनी तिथला विकास करायचा या हेतून विचार करू लागले. तिथली लोक शेती करतात. ज्यांना शेती नाही किंवा ज्यांच्या घरी शेती करायला अधिक लोक आहेत असे तरूण जवळच्या शहरात नोकरीसाठी जातात. पण इथला तरूण इथं रहावा या अनुशंगाने तिथल्या बाजीराव पाटील या तरूणाने पाण्यात बोटिंग सुरू करण्याचा विचार केला. त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि परवानगी मिळवण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्थरावरती प्रयत्न केले. अनेक दिवस प्रयत्न करीत असलेल्या तरूणाला अखेर काही अटींवरती बोटींग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

तिथं बोटींग करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर, तिथल्या परिसरात अभ्यास करून बोटिंग सुरू करण्याचं ठरवण्यात आलं. काही महिने त्याच्यात गेले. त्यानंतर अनेकांचे सल्ले घेण्यात आले. त्यानंतर बोटिंगची पाण्यातली हद्द ठरवण्यात आली. सगळ ठरल्यानंतर तिथं बोटी आणण्यात आल्या. तिथं बोटी आल्यानंतर शाहुवाडी, शिराळा, कराड तालुक्यात याची सुरूवातीला जाहिरात करण्यात आली. लोकांना बोटिंग जवळ झाल्याचे माहित झाल्यानंतर तिथं लोकांनी भेटी द्यायला सुरूवात केली. त्यानंतर तिथल्या तरूणांनी तिथं फार्म हाऊस तयार केलं. जेणेकरून लोकांना तिथं राहता आलं पाहिजे.

२०१७ मध्ये बोटिंग व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिल्यावर्षी पर्यटन व्यवसायाला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच भागातील लोकांना हा व्यवसाय माहित झाला. तसंच गावातील आर्थिक चलन सुध्दा वाढू लागलं. कारण गावापासून १ किलोमीटरवरती व्यवसाय असल्याने लोकांना लागणा-या वस्तू लोक गावात घेऊ लागले. तिथं पर्यटक म्हणून आल्यानंतर अनेक पर्यटकांनी फोटो सोशल मीडियावरती वापरले त्यामुळे आमचा अधिक प्रसार झाला असं बाजीराव पाटील यांनी सांगितले.

मागच्या दोन वर्षात तिथं अधिक तरूण पर्यटक तिथं येत होते. कारण हे तरूणाई तिथं यावी आणि बोटींगमध्ये बसून अनुभव घ्यावा एवढचं या अनुशंगाने तयार करण्यात आलं होतं. कारण गाव तालुक्यातल्या एका कोप-यात असल्यानं शेती करणारी मंडळी फक्त गावाकडं असायची तिथं तरूणांनी रहावं व्यवसाय करावा या अनुशंगाने बोटिंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. त्याला यशही आलं होतं. परंतु कोरोनाच्या काळात मे महिन्यातील सीजन गेलाच आहे. आता केव्हा बोटींग सुरू होईल हे निश्चित सांगता येत नाही असंही पाटील यांनी सांगितले.

या ठिकाणावरती मागच्या तीन वर्षात शिराळा, पन्हाळा, शाहुवाडी, कराड, सातारा, इस्लामपूर, वाळवा या तालुक्यातून पर्यटक येत होते. हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातलं तिथून सांगली जिल्हा ८ किलोमीटरवरती आणि सातारा ३० किलोमीटरवरती असं हद्द असल्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील पर्यटक तिथं पोहचत होतं. सप्टेंबर संपला की बोटींगला सुरूवात व्हायची. सप्टेंबरनंतरचा निसर्ग पाहायला अधिक तरूण तिथं येत होते. परंतु यंदा तसं होईल असं वाटतं नाही असं पाटील यांनी बोलून दाखवलं. चरण सोंडोली हा पूल सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडतो. त्यामुळे तिथून यायला अधिक सोयिस्कर पडतं असं पर्यटकांचं म्हणणं आहे. रस्त्यावरून जाताना सुध्दा अनेक जेवणाचे हॉटेल आहेत. तेही ग्राहक नसल्याने चिंताग्रस्त झाले आहेत.

कोरोनानंतर परिस्थिती इतकी बदलेलं असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण कोरोनामुळे जगाचं अर्थचक्र बदललं आहे. तसेच भारतातही अजून पर्यटन व्यवसायास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पुर्णपणे विस्कळीत झाला आहे. मार्चपासून बंद असलेला पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास अनेकांकडे भांडवलं सुध्दा नाही. ही परिस्थीती सुरळीत व्हायला कितीकाळ लागेल निश्चित नसल्याने खुपचं अवघड झाले आहे. मार्च महिन्यापासून बोटिंग बंद असल्याने बोटी खराब झाल्या आहेत. त्यासाठी सरकारकडून काही मदत मिळते याची चौकशी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

माझी चहाची टपरी चरण-सोंडोली पूलानजीक आहे. रस्त्यावर असल्याने बाहेरून येणारे पर्यटक चहा पिण्यासाठी माझ्याजवळ थांबतं होते, परंतु कोरोनाच्या काळात व्यवसाय पुर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारण पर्यटन बंद असल्याने लोकांची रहदारी शुन्य आहे. स्थानिक लोकांकडे पैसे नसल्याने ते दुकानात येत अशी खंत सागर पाटील यांनी बोलून दाखविली.

जेव्हा कांडवनला पर्यटन सुरू झालं तेव्हा तिथलं अर्थकारण चांगलं झालं. कारण वाहतूक वाढली. तिथं पर्यटकांना पोहचवण्यासाठी स्थानिक तरूणांनी चारचाकी गाड्या घेतल्या त्यामुळे त्यांना रोजगार मिळाला. सात ते आठ किलोमीटर परिसरात जेवणाचे धाबे आणि अन्य सुविधा लोक देऊ लागली. लोकांची सतत रहदारी असल्याने मार्केट खेळता पैसा राहू लागला. पण कोरोनामुळे सर्वकाही डपघाईला आले आहे. मी स्वत: व्यवसाईक आहे. व्यवसायिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऑगस्टमध्ये परिस्थिती सुधारायला सुरूवात झाली होती. परंतु गणपतीच्या काळात आलेल्या लोकांनी सामाईक अंतर आणि इतर गोष्टी पालन केले नसल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या अधिक वाढली आहे. - नामदेव कोठावळे

 

माझं नाव रतन मगदूम इथला हॉटेल व्यवसायिक आहे. पर्यटन सुरू झाल्यानंतर हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी असायची परंतु मागच्या मार्च महिन्यापासून हॉटेल पुर्णपणे बंद आहे. आता मी हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला भाजीपाला विकून आपलं घर संभाळत आहे. भागात अधिक पेशंट असल्यामुळे व्यवसाय सुरू करण्यास भीती वाटतं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News