डोनाल्ड ट्रम्प यांनाही भावला 'शुभ मंगल ज्यादा सावधान' केलं 'असं' ट्विट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • .आयुष्मानचा 'गे' तरुणाची भूमिका असणारा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांची प्रमुख भूमिका असून  गुप्ता, गजराज राव यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. 

नवी दिल्ली - 'विकी डोनर' चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधील कमी वेळेत यशस्वी होणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्मान नेहमीच आव्हानात्मक भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या समोर येत असतो. आणि म्हणूनच अगदी कमी कालावधीत त्याचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढत आहे.आयुष्मानचा 'गे' तरुणाची भूमिका असणारा आगामी चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांची प्रमुख भूमिका असून  गुप्ता, गजराज राव यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. 

चित्रपटाचा विषय हा अतिशय संवेदनशील असल्याने जागतिक स्तरावरून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. खुद्द अमिरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे ट्विटरवरून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये ब्रिटिश अ‍ॅक्टिविस्ट पीटर गॅरी टॅचेल यांनीदेखील एक ट्विट केलं आहे. ट्विट करताना ते म्हणाले की, भारतात समलैंगिक कायदा मान्य  झाल्यांनतर पहिल्यांदाच असा चित्रपट पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचं कौतुक आहे तसेच या चित्रपटाद्वारे समाजामध्ये समलैंगिकतेबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल आणि हे चांगलेच आहे. पीटर यांच्या या ट्विटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका शब्दात ग्रेट असं रिट्विट केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या रिट्वीटवर पीटर यांनी पुन्हा रिट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे एलजीबीटीचे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. अशी मी अशा करतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

समलैंगीतका दाखवणारे अनेक चित्रपट यापूर्वी बॉलीवूडमध्ये येऊन गेले आहे. पण त्यातील बहुतांशी चित्रपट हे विनोदी अंगाने दाखविण्यात आले. या सर्व चित्रपटांमध्ये आयुष्मानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट वेगळा असून एका छोट्याशा शहरात समलैगिकता ठेवणारे दोन तरुण असतात, आणि त्याबद्दल असणारा गावकऱ्यांचा गैरसमज कसा दूर केला जातो याचं विनोदी चित्रण केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News