या टीव्ही जोडप्याने लग्नानंतर लगेचचं घेतला घटस्फोट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून गोष्टी सामान्य नव्हत्या. याचमुळे दोघं वेगळेही रहायचे. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचं कारण जाणून घेण्यासाठी करण शर्माला संपर्क केला असता त्याने याविषयावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

मुंबई : टीव्ही कपल करण शर्मा आणि तियारा कर यांनी लग्नाच्या तीन वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दोघांनी अधिकृतरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांनंतर करण आणि तियारा वेगळे झाले.
घरच्यांच्या विरोधात अभिनेत्रीने केलं लग्न
दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून गोष्टी सामान्य नव्हत्या. याचमुळे दोघं वेगळेही रहायचे. अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचं कारण जाणून घेण्यासाठी करण शर्माला संपर्क केला असता त्याने याविषयावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तर तियारानेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
करण आणि तियाराने २०१५ मध्ये साखरपुडा केला होता. १९ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १६ नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केलं. करण गढवाली आहे तर तियारा बंगाली. यामुळे दोघांनी दोन पद्धतीने उत्तराखंड येथील रानीपोखरी येथे लग्न केलं होतं.
दोघांच्या लग्नात टीव्हीसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करणने आतापर्यंत ये रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता, एक नई पहचान, काला टीका या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर तियारा अभिनेत्री आणि गायिका आहे. इंडियन आयडॉलच्या पाचव्या सीझनमुळे तियारा प्रकाशझोतात आली होती. तिने आशिकी आणि ट्विस्टवाला लव या शोमध्ये काम केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News