प्रेमात धोका म्हणून tv ऍक्टरने सुरू केलं आंदोलन; दोन मुलं असुनदेखील होते विवाहबाह्य संबंध...

यिनबझ टीम
Thursday, 6 February 2020

आता प्रेम करण्यासाठी समोरासमोर भेट होणे किंवा तोंड ओळख असणे काहीच गरजेचं नाही. सध्या सोशल मिडीयावर देखील अनेक नाती जुळली जातात ज्यांची कोणतीच ग्वाही दिली जात नाही. असच सोशल मिडीयावर जुळलेलं नात तुटल्याने एका टिव्ही अॅक्टरवर आंदोलन करायची वेळ आली आहे.

आता प्रेम करण्यासाठी समोरासमोर भेट होणे किंवा तोंड ओळख असणे काहीच गरजेचं नाही. सध्या सोशल मिडीयावर देखील अनेक नाती जुळली जातात ज्यांची कोणतीच ग्वाही दिली जात नाही. असच सोशल मिडीयावर जुळलेलं नात तुटल्याने एका टिव्ही अॅक्टरवर आंदोलन करायची वेळ आली आहे.

युपीच्या एका टिव्ही अॅक्टरने बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातल्या तारापूर येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तिच्यामते संबंधीत तरुणाने आपल्यासोबत गेली 5 वर्षे प्रेमाचे नाटक करून आपले लैंगिक शोषण केले आणि सोबतच आपल्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.

युपीच्या कटिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अॅक्टर अरुणा देवी पांडे हिचे गेल्या पाच वर्षांपासून बिहारच्या राहुलसोबत प्रेमसंबंध होते. इतकच नाही तर अरुणाचे गेल्या काही वर्षांपुर्वी दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्नही झाले होते, या दोघांना 2 मुलेदेखील आहेत. विवाहबाह्य संबंध असलेल्या राहुलला धडा शिकवण्यासाठी अरुणाने युपीच्या कटिहार येथे आंदोलन सुरू केले आहे. अरुणाने संबंधीत तरुणाचे आणि आपले एकत्र असलेले फोटो पोस्टरवर छापून जागोजागी लावले आहेत.

11 डिसेंबर 2019 रोजी अरुणाने कटिहारला जाऊन आपल्याकडे असलेले जवळपास साडेपाच लाखांचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख रक्कम राहुलकडे दिले असल्याचे सांगितले, त्यानंतर मात्र राहुलने तिच्याशी बोलणं कमी केलं तसेच आपला नंबर बदलून बोलणे थांबवल्याचे, तक्रार नोंदवताना अरुणाने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News