संकटाचे रुपांतर संधीमध्ये करणारे कोईंबतूरचे युवा नवउद्योजक

सलील उरुणकर
Monday, 2 November 2020

आपल्या दैनंदिन जीवनशैलीच्या दृष्टीने असलेला सर्वांत महत्त्वाचा पैलू लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे योग्य ती उत्पादने व सेवा देण्याचे काम माय कंपनीकडून केले जाणार आहे.

पुणेः कोव्हिडच्या महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आल्याचे आपण वाचले, ऐकले किंवा पाहिले असेल. पण या संकटाचे रुपांतर संधीमध्ये खूप कमी लोकांनी केले. त्यापैकी एक, नव्हे दोन, म्हणजे कोईंबतूरमधील केविन कुमार कंदास्वामी आणि राजा पलानीस्वामी हे दोघे नवउद्योजक. कोव्हिडपासून बचावासाठी लागणारे मास्क, स्कार्फ, युव्ही सॅनिटायझर अशा अनेक पर्सनल लाईफस्टाईल उत्पादनांचा पुरवठा करणारी माय नावाची कंपनी त्यांनी सुरू केली आहे. इनोव्हेशन, डिझाईन आणि शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन केलेली उत्पादने ही या युवा नवउद्योजकांचे वैशिष्ट्य.

भारतीय बनावटीचे अल्ट्राव्हायोलेट वन पाॅकेट सॅनिटायझर आणि युव्ही सेफ टेबलटाॅप सॅनिटायझर यासह अँटीव्हायरल प्रोटेक्शन मास्क, स्कार्फ आणि अन्य उत्पादने कंपनीमार्फत बाजारात आणण्यात आली आहेत.

केविन कंदास्वामी म्हणाला, आपल्या दैनंदिन जीवनशैलीच्या दृष्टीने असलेला सर्वांत महत्त्वाचा पैलू लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे योग्य ती उत्पादने व सेवा देण्याचे काम माय कंपनीकडून केले जाणार आहे. अशा महत्त्वाच्या प्रोडक्ट व सेवांसाठी जागतिक सप्लाय चेनवर असलेले अवलंबत्व कमी करून आपल्या देशाला कोव्हिडसारख्या भविष्यातील महामारींना सामोरे जाण्यासाठी सक्षम करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News