श्रियाही वेबसीरित पदार्पण करणार

सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Monday, 15 April 2019

आगामी प्रोजेक्‍टमध्ये श्रिया-अली एकत्र काम करताहेत. नेटफ्लिक्‍सचा हा नवा प्रोजेक्‍ट हा वेबसीरिज की चित्रपट असणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर काही मोजक्‍या चित्रपटांत झळकली. अभिनेत्रीबरोबरच निर्माती-दिग्दर्शिका म्हणून तिने काम केलं आणि आता श्रिया वेबसीरिजच्या दिशेला वळली आहे; तर दुसरीकडे अभिनेता अली फजलही वेबसीरिज विश्‍वातील स्टार बनला आहे. श्रिया-अलीने ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये एकत्र काम केलं. आता ही जोडी पुन्हा एका नव्या प्रोजेक्‍टसाठी एकत्र येणार आहे.

आगामी प्रोजेक्‍टमध्ये श्रिया-अली एकत्र काम करताहेत. नेटफ्लिक्‍सचा हा नवा प्रोजेक्‍ट हा वेबसीरिज की चित्रपट असणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण दिग्दर्शक शशांक घोष नेटफ्लिक्‍सवर काहीतरी हटके विषय घेऊन येणार आहेत. शशांक यांनी ‘वीरे दे वेडिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. श्रिया-अलीचं काम पाहता त्यांनी या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मिर्झापूर’नंतर ही जोडी काय कमाल करते हे पाहूयात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News