दहावी परीक्षा : उत्तर आठवलं नाही तर वापरा 'या' ट्रिक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
 • नेमकं पेपर लिहिताना काही आठवेनासे होते. अशावेळी विद्यार्थ्यांना घाम फुटतो. भीतीमुळे आणखी गोंधळ उडतो.

दोन महिन्यांपासून संपूर्ण अभ्यास पूर्ण झालेला आहे. मात्र नेमकं पेपर लिहिताना काही आठवेनासे होते. अशावेळी विद्यार्थ्यांना घाम फुटतो. सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. दोन महिन्यांपासून संपूर्ण अभ्यास आणि उजळणी पूर्ण झाली असते. नेमकं पेपर लिहिताना काही आठवेनासे होते. अशावेळी विद्यार्थ्यांना घाम फुटतो. भीतीमुळे आणखी गोंधळ उडतो. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, कारण अशा काही ट्रिक्स आहेत, ज्यामुळे परीक्षेत काही आठवलं नाही तरी मार्क्स मिळू शकतात. 

 • दहावीची परीक्षा म्हटलं की, विद्यार्थी गोंधळून जातात. मनात एक भीती असते. परीक्षा केंद्रावर पोहचेपर्यँत ही भीती कायम असते. मात्र अशावेळी शांत राहणं फायदेशीर ठरते. 
   
 • वर्गात सर्वप्रथम पेपर हातात आल्यानंतर शांत डोक्याने पेपर वाचा. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्यामुळे नेमकं प्रश्नात काय आहे ते कळेल. 
   
 • प्रश्नांची उत्तरे लिहिताना काही आठवेनासे झाले तर घाबरून जाऊ नका, तो प्रश्न सोडून जे प्रश्न येतात ते पहिले सोडवा. 
   
 • पेपरमधील काही प्रश्नांच्या उत्तरांचे मार्क्स आपल्या हातात असतात. विशेषतः ऑब्जेक्टीव्ह प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे थोडं विचारपूर्वक लिहा. काहीजण विचार न करता उत्तरं ठोकून येतात, पण थोड लॉजिक लावून विचार केला तर यामध्ये पूर्ण मार्क्स मिळू शकतात. 
   
 • पेपरमधील उताऱ्यावरील प्रश्नांचे मार्क्स मिळवणे थोडं सोपे असते. ज्याठिकाणी आपलं मत मांडण्याचा प्रश्न असतो, त्याठिकाणी आपल्याला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. 
   
 • पेपर लिहिताना आपल्याला काहीच आठवले नाही, तरी मुद्द्याला धरून तुम्ही लिहू शकतात. त्या विषयाला अनुसरून मुद्देसूद पद्धतीने उत्तरे लिहिल्यास तुम्ही मार्क्स मिळवू शकतात.
   
 • परीक्षेला तीन तास बसने बंधनकारक असते. त्यामुळे तुम्हाला जरी पेपरमध्ये काही आठवलं नाही, तरी तुम्हाला पेपर अर्धवट सोडून जात येणार नाही. त्यापेक्षा थोडा विचार करून आठविण्याचा प्रयत्न करा. 
   
 • काहीवेळा एखाद्या प्रश्नातच उत्तर दडलेलं असते. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यातील एखादा कि-वर्ड आपल्याला उत्तर देऊ शकतो. त्यानुसार मुद्दे काढून उत्तर लिहिल्यास फायदा होईल. त्यामुळे जर तपासणारा व्यक्ती घाईत असेल तर फक्त मुद्द्यांवर लक्ष देत मार्क्स देतील. 
   
 • एखादा प्रश्न कळत नसेल तर तो पुन्हा वाचा. त्यामुळे तुम्ही तो प्रश्न इमॅजिन करू शकता. त्यातून उत्तर सुचेल.  
   
 • काहीही झालं तरी पेपर रिकामा सोडू नका, शक्य होईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. 
   
 • एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तरी त्याची सुरुवात चांगली करावी, थोडे मुद्दे लिहावेत. पेपर तपासणारे शिक्षक पूर्ण उत्तर वाचतीलच असं नाही. त्यामुळे उत्तराची सुरुवात चांगली करणे फायदेशीर ठरेल. 
   
 • पेपर लिहिताना टापटीपपणे लिहा. कारण खाडाखोड झालेला, विचित्र पद्धतीने लिहिलेला पेपर शिक्षकांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे शक्यतो पेपर लिहिताना सुटसुटीतपणे लिहा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News