ट्रम्पच्या 'या' निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 July 2020

या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठांना न्यायालयीन लढाई लढावी लागली.

वॉशिंग्टन डीसी : डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेत राहून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ट्रम्प सरकारने घेतलेला निर्णय गुरुवारी रद्द करण्यात आला, अशी माहिती इमिग्रेश आणि कस्टम मंत्रालयाने अमेरिकेतील न्यायालयात दिली. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न मिटला. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठांना न्यायालयीन लढाई लढावी लागली.

 जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी देश- विदेशातील अनेक विद्यार्थी उत्सूक असतात. विविध परीक्षा देऊन अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतात. अमेरिकेत राहून शिक्षण पु्र्ण करतात. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत राहून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प सरकारने रद्द केला होता. ड्रम्प सरकारच्या निर्ययाविरोधात अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंन्स, हार्वर्ड, एमआयटी विद्यापीठांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने ट्रम्प सरकारला बाजू मांडण्याची संधी दिली. ड्रम्प सरकारने आपली बाजू मांडताना व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले.

'ज्या विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला त्याच्यावरची कार्यवाही आम्ही मागे घेतली आहे, यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला जाणार नाही' असे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालायत सादर केले. देशभरातील  १० लाख विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. त्यापैकी २ लाख विद्यार्थी भरतीय आहे. या निर्णामुळे २ लाख भारतात विद्यार्थ्यांना परत यावे लागणार होते. पदवीका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एचवन, एनवन व्हिसा दिला जातो. सध्या अमेरिकेत सर्वांधीक विद्यार्थी चिन, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मणी देशाचे आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News