ट्रोलिंगमुळे तरुणाईत वाढले मनोविकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 May 2019

स्पर्धात्मक करिअर, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी सवय, नोकरीच्या ठिकाणच्या समस्या, कौटुंबिक समस्या यांसह वैयक्तिक समस्यांमुळे तरुणाई नेहमीच मानसिक तणावात असल्याचे दिसून येते.

स्पर्धात्मक करिअर, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी सवय, नोकरीच्या ठिकाणच्या समस्या, कौटुंबिक समस्या यांसह वैयक्तिक समस्यांमुळे तरुणाई नेहमीच मानसिक तणावात असल्याचे दिसून येते. त्यात आता सोशल मीडियाचा वापर, त्यावर होणारे ट्रोलिंग आणि ऑनलाईन गेम्सचे व्यसन या कारणांची भर पडली आहे.

सतत मोबाईलच्या स्क्रीनवर असणारे डोळे, त्याच्यावर चालणारी बोटे, एखादा ऑनलाईन गेम खेळताना चाललेली व्हर्च्युअल स्पर्धा, त्यातच मॉर्निंग - इव्हिनिंग सेल्फीज, फोटोज्‌, त्याचे सोशल मीडियावर शेअरिंग आणि त्या फोटोज्‌वरून होणारे ट्रोलिंग या सर्व स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात तरुणाई अडकली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. चिंतेची बाब म्हणजे शाळकरी मुलांतही याचे प्रमाण अधिक आहे.

हे आहेत आजार 

 सेल्फायटिस - (सेल्फी काढण्याचे व्यसन)
 ऑनलाईन गेम ॲडिक्‍शन 
 फेसबुक डिप्रेशन 
 नैराश्‍य 
 मन एकाग्र न होणे
 सायकोसिस 
 डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश)

 इंटरनेट व सोशल मीडियाचा अतिवापर

- सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया
- फेसबुकमुळे येणारा तणाव 
 - ऑनलाईन गेमच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम 
-  ऑनलाईन गेम खेळताना येणारा तणाव
- सोशल मीडियावर सर्फिंग करताना इतरांकडून मिळणारी     वाईट वागणूक
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News