ट्रेंडी ‘चश्‍मिष’पण!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

फॅनी, कॅट आय वगैरे चष्म्याच्या फ्रेम्स घेण्याच्या फंदात पडू नका. तुमचं फक्त ‘मिरवणं’ पकडलं जाऊ शकतं. नंबरचा चष्मा वापरताना काचेची खास काळजी घेतली जाते; त्यामुळे खोट्या चष्म्याच्या काचेवर चिरा वगैरे पाडू नका.

‘ये  जवानी हे दिवानी’मध्ये डोळ्याला चष्मा, हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन उभ्या असलेल्या दीपिकाला पाहताक्षणी रणबीर ‘चष्मिश’ म्हणतो. एरवी कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने मुलीला असं म्हटलं असतं, तर तिने सरळ त्याचे दात तोडले असते. पण रणबीरच्या ‘चश्‍मिष’ बोलण्यामध्येही मुलींनी रोमॅंटीकनेस शोधला. एरवी फॅशनिस्टा म्हणून मिरवणारी सोनम तिच्या इंस्टाग्रामवर मोठ्या फ्रेमचा चष्मा घालून बसलेली दिसते.

सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, रणबीर कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम अशा कित्येक बॉलीवूड सेलेब्रिटीजनी इव्हेंट्‌समध्ये चष्मा घातलेला पाहायला मिळतो. अर्थात यातील बऱ्याच सेलेब्रिटीजना नंबरचा चष्मा आहे; पण त्यांच्यामुळे चाष्म्यातलं ‘स्टायलिश दिसणं’मध्ये आलंय. आणि त्यासाठी नंबरवाला चष्मा असलाच पाहिजे, ही गरजही बाजूला पडली आहे. त्यामुळे स्ट्रीट मार्केटवर फेरीवाल्यांकडेही साध्या काचेचे चष्मे पाहायला मिळतायत. 

‘एरवी चष्मा लावावा लागेल’, असं डॉक्‍टरने निदान केल्याबरोबर ‘लेन्स’ लावल्या तर चालतील का?’ हा प्रश्न सहज विचारला जायचा. पण चष्मा लावल्यास डोळ्यांमध्ये सिरीयसवाला ‘इंटेन्स’ लुक येतो. डोळ्यावर चष्मा आणि हातात एखादं पुस्तक घेऊन कॅम्पसमध्ये फिरलं तरी मुलींमध्ये ‘स्कॉलर’टाईप म्हणून मिरवता येतं. नव्याने नोकरीला लागलेलं असताना केवळ इंटर्न किंवा फ्रेशर म्हणून वावरण्यापेक्षा चष्म्याने येणारा पोक्तपणा तरुणाईला हवाहवासा वाटू लागला आहे. त्यासाठी डोळ्याला नंबर हवाच, हेही गरजेचं राहिलं नाही. नंबर नसलेला, साध्या काचेचा; पण स्टायलिश फ्रेम असलेला चष्मा वॉडरोबची गरज बनलेला आहे. त्यामुळे चष्म्यांमध्येही भरपूर विविधता पाहायला मिळतेय.

अर्थात चष्मा मिरवताना थोडी काळजीही घ्यावी लागते. अति फॅनी, कॅट आय वगैरे चष्म्याच्या फ्रेम्स घेण्याच्या फंदात पडू नका. तुमचं फक्त ‘मिरवणं’ पकडलं जाऊ शकतं. नंबरचा चष्मा वापरताना काचेची खास काळजी घेतली जाते; त्यामुळे खोट्या चष्म्याच्या काचेवर चिरा वगैरे पाडू नका. त्यातूनही खोटेपणा पकडला जातो. चष्म्याची फ्रेम तुमच्या चेहऱ्याला साजेशी असू द्यात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News