थंडीत स्मार्ट लूकसाठी 'उबदार' कपडयांचा ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी  फॅशनेबल उबदार कपड्यांची चलती आहे. अनेक नवनवीन डिझाइनच्या विविध फॅशनच्या स्वेटर, मफलर व मखमली स्टोल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेंड दिसून येत आहे. 

पिंपरी : प्रत्येक ऋतूमध्ये कपड्यांची फॅशन बदलतेय. परिणामी, आता हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी  फॅशनेबल उबदार कपड्यांची चलती आहे. अनेक नवनवीन डिझाइनच्या विविध फॅशनच्या स्वेटर, मफलर व मखमली स्टोल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेंड दिसून येत आहे. 

शहरातील पिंपरी कॅम्प, चिंचवड येथील दुकाने, मॉलसह उपनगरातील विविध भागात रस्त्यावरदेखील उबदार कपड्यांची जोरात विक्री सुरू आहे. विविध रंगी स्वेटर, जॅकेट, विंटर शूज, मफलरसह मखमली स्टोल्स या उबदार कपड्यांनी बाजार सजला आहे.  

महिला, लहान मुलांसाठी ट्रेंडी कपडे

थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांच्यासाठी विविध डिझाइनचे जेन्ट्‌स, लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, लेस्कोटी, स्वेट टीशर्ट, कुर्तापॅटर्न, जेन्ट्‌स मास्क फॅन्सी स्वेटर, हॅन्ड ग्लोव्हज, कानटोपी अशा वस्तूंना मागणी वाढली आहे. ५० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांच्या जॅकेट बाजारात आहेत. शिवाय महिलांसाठी वूलन कोट, लेडीज फेदर कोट, वूलन जॅकेट, नेहमीच्या वापरातले स्वेटर, मऊ कापसासारखे स्वेटर ७०० रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांच्या कपड्यांमध्येही खूप विविधता पाहायला मिळतेय. त्यांच्या हातमोज्यांपासून ते बंद गळ्याचे जॅकेट्‌स, कानटोप्यांचे, शालींचे निरनिराळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पुरुषांनाही इतरांपासून आपला लुक वेगळा दिसण्यासाठी स्टायलिश जॅकेट व मफलर खरेदीवर भर दिला आहे. 

‘स्मार्ट लुक’साठी 

थंडीत उबदार कपडे अंगावर चढत असले तरी पायाकंडे विशेष लक्ष दिले जात नाही. मात्र, आता स्टायलिश उबदार पादत्राणेदेखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ‘स्मार्ट लुक’साठी हिल्सवाले शूज स्वेट शर्ट, जीन्सवर हटके लुक देऊ शकतात. 

श्रगची फॅशन

सध्या शहरात ‘आयटीयन्स व कॉलेजिन्समध्ये श्रग वापरण्याचा ट्रेंड रुजला आहे. त्यामुळे जीन्स अथवा लाँग स्कर्टवर श्रगची चलती आहे. हिवाळ्यात होजिअरी व लोकर मटेरियलमधील लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारामध्ये श्रग बाजारात उपलब्ध आहे. ९०० ते ११००पर्यंत त्याची किंमत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News