तरूणाईचा कल पर्यटनाकडे

महेश घोलप
Wednesday, 19 August 2020

३२ शिराळा, वाळवा, कराड, शाहूवाडी या शेजारच्या तालुक्यातून अनेक पर्यटक भरलेलं पाहावयास येत आहेत.

तरूणाईला कल पर्यटनाकडे

कोरोनामुळे गावाकडं आलेले तरूण अजून गावाकडचं आहेत. अनेकांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावात छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी आपल्या शेतीकडे लक्ष वळविले आहे. गावाकडं असलेल्या तरूणांना निसर्ग अधिक खुणावत असल्याने त्यांचा अधिक ओढा पर्यटनाकडे असल्याचे पाहायला मिळत आहे.

सांगली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरती असलेले चांदोली अभ्यारण्य तसेच अभ्यारण्याच्या पायथ्याशी असलेले चांदोली धरण अनेकांसाठी पर्यटन स्थळचं झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून चांदोली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे ३२ टीएमसी असलेले धरण पुर्णपणे भरलं आहे. पाऊस सुरू असल्याने धरण परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

३२ शिराळा, वाळवा, कराड, शाहूवाडी या शेजारच्या तालुक्यातून अनेक पर्यटक भरलेलं पाहावयास येत आहेत. धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटक अधिक धरण परिसरात भेट देत आहेत, असं धरण परिसरातील लोकांनी सांगितलं. त्याचबरोबर धरण परिसरात मे महिन्यात अनेक जंगलातील प्राणी दिसल्याने वातावरण भयदायक आहे.

चांदोली धरणापासून चार किलोमीटरवरती कोल्हापूर जिल्ह्यातील उखूळ गावातील डोंगरात मोठा धबधबा आहे. तिथं पर्यटक २ किलोमीटर डोंगरातून पायी चालत जाऊन धबधब्याला भेट देत आहेत. त्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने जाताना अनेकदा पाय घसरतात असं तेथील ग्रामस्त सांगतात.

मी धरण परिसरापासून १० किलोमीटर परिसरात वास्तव करीत असून पाऊस अधिक असल्यानंतर किंवा धरणातून अधिक विसर्ग सुरू झाल्यानंतर चांदोली धरण परिसराला जास्त पर्यटक येतात. तिथं आल्यानंतर पावसात भिजणे, त्यानंतर मोबाईलवरती फोटो काढणे इत्यादी गोष्टी पर्यटक करत असतात. - तुकाराम जगताप

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News