ट्रेंड नव्या नथींचा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • बाजीराव मस्तानी  चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेली आगळी-वेगळी नथ चर्चेचा विषय ठरली होती. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसायही एकीकडे कात टाकत असून, अनेकविध प्रकारांमध्ये नथ उपलब्ध करून दिली जात आहे.

जुनं ते सोनं असे म्हणत अनेक जुन्या फॅशन नव्याने अवलंबल्या जात आहेत. ज्याप्रमाणे नऊवारी साड्या वेगवेगळ्या स्टाईलने परिधान करण्याकडे तरुणींचा कल वाढत आहे; त्याप्रमाणे सोबत साध्या साडीवरही आवर्जून नथ घातली जात आहे. टीव्ही मालिकांमुळे नथीचा ट्रेंड पुन्हा एकदा आला आहे.

खड्याची, मोत्याची, प्रेसची अशा नथी मार्केटमध्ये उपलब्ध असून लग्न-समारंभ, सण किंवा कोणत्याही मंगलप्रसंगी नथ परिधान केली जात आहे. बाजीराव मस्तानी  चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेली आगळी-वेगळी नथ चर्चेचा विषय ठरली होती. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसायही एकीकडे कात टाकत असून, अनेकविध प्रकारांमध्ये नथ उपलब्ध करून दिली जात आहे. महाराष्ट्रीय नथीने तर इतर भाषिक तरुणींनाही भुरळ घातली आहे. 

  • जडाऊ नथ : जडाऊ नथ लग्न-समारंभात खूप उठून दिसते. ही नथ तुम्हाला जडाऊ लेहंग्यासोबत घालता येईल. लग्नात नवरीला विशेषत: राजस्थानी व मारवाडी नथ शोभून दिसते. तुम्ही कशा प्रकारचा लाचा घेता यावर तुमची नथ घालणे अवलंबून असते. मारवाडी, राजस्थानी विवाहित स्त्रियांमध्ये ही नथ वापरण्याची परंपरा आहे. जडाऊ नथ लग्न-समारंभात खूप उठून दिसते. ही नथ तुम्ही जडाऊ लेहंग्यासोबत घालू शकता. 
  • महाराष्ट्रीय नथ : ही नथ महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेकडे असतेच. काठापदरच्या साडीवर ही नथ लग्न- समारंभ किंवा  पारंपरिक सण-उत्सव साजरे करताना आवर्जून घातली जाते. 
  • चेनवाली नथ : ही नथ खास करून साऊथ इंडियन महिला अधिक वापरतात. तुम्ही ज्वेलरी डिझाईनसोबत ही तीन साखळ्या असलेली नथ वापरल्यास तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल. 
  • रिंगवाली नथ : जर तुम्हाला अगदी साधी नथ घालायची असेल तर तुम्ही हलकासा मेकअप करून रिंगवाली नथ वापरू शकता.
  • बंगाली स्टाईल : जर तुम्हाला बंगाली नथ घालायची असेल तर तर हलक्‍या क्रॉफ्टवाल्या आणि साखळीने जोडलेली नथ तुम्हाला अधिक आकर्षक दिसेल. बंगाली साडीवर ही नथ खूप शोभून दिसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News