तरुणांईमध्ये गाजतोय टॅटुंचा "हा" ट्रेंड

सकाळ वृत्त सेवा (यिनबज)
Tuesday, 1 October 2019

टॅटू काढायची अनेकांना इच्छा असते, मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं काय काढायचं, हा प्रश्‍न पडतो. अनेकदा घरच्या लोकांना टॅटू काढणं पसंत नसतं. अशावेळी तरुणाई मिनी टॅटूला पसंती देते.

टॅटू काढायची अनेकांना इच्छा असते, मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं काय काढायचं, हा प्रश्‍न पडतो. अनेकदा घरच्या लोकांना टॅटू काढणं पसंत नसतं. अशावेळी तरुणाई मिनी टॅटूला पसंती देते. कॉलेजची दोस्त मंडळीच नव्हे, तर कॉर्पोरेट जगातील मंडळीही हे टॅटूज आवडीनं काढून घेतात. कर्मचारी, डॉक्‍टर, मॉडेल यांच्या अंगावर हे मिनी टॅटू बघायला मिळतात. मिनी टॅटू म्हणजे एखादं चिन्ह वा स्क्रिप्ट. हे टॅटू दिसायला जरी छोटे असले तरी त्यात बराच अर्थ लपलेला असतो. स्वतःबद्दल अधिक सांगणारी ही चिन्हं आहेत. त्याशिवाय छोटे टॅटू लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे कुणी त्याबद्दल चटकन तक्रार करत नाही. हे टॅटू पायावर, मनगटावर, हाताच्या बोटांवर आणि मानेवर काढले जात आहेत.

मिनी टॅटूंना मुलींमध्ये अधिक पसंती आहे. त्याच कारण म्हणजे हे टॅटू दिसायला अगदी नाजूक व मोहक असतात. ते डोळ्यांत भरत नाहीत. मुलं जास्तीत जास्त एखादा शब्द काढतात. फेथ, हॅपीनेस, पॉवर आदी शब्द काढले जातात. ज्यांना क्रिएटिव्हिटी, डिझाइनचं आकर्षण नसतं, त्यांना हे मिनी टॅटू आवडतात. हे टॅटू काढायला साधारण एक ते दोन हजार रुपये खर्च येतो.

टॅटू आणि त्यांचे अर्थ

  • अर्धविराम : डिप्रेशन व इतर मानसिक आजारांवर मात करणारा
  • इन्फिनिटी : अमर्यादित प्रेम
  • डेल्टा : परिवर्तनसाठी तयार
  • पक्षी : उमेद बाळगणं, खंबीरपणा
  • अँकर : स्थिरता, खंबीर

शरीरावर टॅटू काढताना घ्यावयाची काळजी.
एकदा शरीरावर टॅटू काढला तर तो कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे टॅटू काढताना अतिशय कल्पकतेने काढावा. प्रत्येक ग्राहकासाठी वेगळ्या सुया वापरणे, स्वच्छता राखणे, ग्लोव्हज वापरणे अशा वेगवेगळ्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. टॅटू काढताना त्वचेच्या कोणत्या थरापर्यंत रंग टोचले जावेत, यात गडबड झाल्यास त्वचेला इजा होऊन त्याचा चट्टा राहू शकतो.

टॅटू काढलेली जागा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य पद्धत वापरणे, ती त्वचा खसाखसा न चोळणे, काही काळ सूर्यप्रकाशात ती उघडी न ठेवणे अशी काळजी घ्यावी. शरीरावर जिथे टॅटू काढायचा तिथे एखादी महत्त्वाची शीर वा रक्तवाहिनी असेल तर त्याला इजा पोचून पांगळेपणा येऊ शकतो, तसेच रक्तवाहिनीतून संसर्ग होऊन त्या भागाला ‘गॅंगरीन’ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे टॅटू ही खबरदारीचे निकष पाळणाऱ्या ठिकाणी व त्यातील धोक्‍यांबद्दल ज्ञान असलेल्या व्यक्तीकडूनच करून घेणे योग्य

टॅटू काढल्यानंतर सुमारे पुढील सहा महिने रक्तदान करू नये.

  • चांगल्या दर्जाच्या टॅटू पार्लरमधूनच टॅटू काढून घ्या.
  • पहिल्यांदा लहानसा ट्रायल टॅटू काढून घ्या.
  • तुम्हाला त्वचेची ॲलर्जी असल्यास टॅटू काढू नका.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News