हा ट्रेंड सोशल मीडियावर भाव खातोय!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 24 May 2020

लॉकडाऊनमुळे समाजमाध्यमांवर नेटकरी जास्त वेळ घालवीत आहेत. त्यातही मुलींच्या वेगवेगळ्या आव्हानांचे ट्रेंड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. साडी, जोडीच्या फोटोनंतर आता "नथीचा नखरा' हा ट्रेंड सोशल मीडियावर भाव खातो आहे. मुलींनी आपले नथीचे फोटो समाजमाध्यमांच्या स्टेटसला ठेवण्याच्या ट्रेंडवर नेटकऱ्यांनी अनेक गमतीशीर मीम्स शेअर केले. मुलांनीही मुलींच्या या ट्रेंडला चिडवण्याची संधी समाजमाध्यमांवर सोडली नाही.

संपूर्ण जग आज कोरोनाशी लढत आहे. काही देशांनी आपापल्या देशातील लॉकडाऊन शिथिल केले आहे. अर्थकारण थांबल्याने बलाढ्य देशांचीही वाताहात झाली आहे; परंतु इतर देशांच्या तुलनेत भारतात काय परिस्थिती आहे. याबाबत नेटकरी समाजमाध्यमांवर चर्चा करीत आहेत. देशातील आकडा आता लाखाच्या पार गेला आहे. त्यामुळे नेटकरी आता जास्त चिंता व्यक्त करीत आहेत.

राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने गुणाकार सुरू केला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी अपयशी ठरतंय, अशी टीका विरोधी पक्ष भाजप करीत आहे. त्यामुळे भाजपने शुक्रवारी सरकार विरोधी आंदोलन केले. या आंदोलनाची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. अनेकांनी राज्य सरकार कोरोनाला नियंत्रित करण्यास खरंच कमी पडतेय का, असा सवाल या निमित्ताने विचारला, तर अनेकांनी भाजपच्या आंदोलनावर टीकादेखील केली.

राज्यात दोन महिन्यांनंतर रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत एसटी बसेस सुरू होणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासाची नवी नियमावली काय असणार आहे. याबाबत नेटकरी शोध घेत होते.

येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान इद आहे. ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव खरेदी करीत असतात; परंतु त्यांना यंदाच्या खरेदीला मुकावे लागणार आहे. कोरोनामुळे अनेक मुस्लिम बांधवांनी एकत्र येत खरेदीची आणि ईद साजरी करण्याची रक्कम कोरोना बाधितांना मदत म्हणून देऊ केली आहे. समाजमाध्यमांवरही ईद घरातच आणि साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी, असे आवाहन नेटकरी करीत आहेत.

लॉकडाऊनमुळे समाजमाध्यमांवर नेटकरी जास्त वेळ घालवीत आहेत. त्यातही मुलींच्या वेगवेगळ्या आव्हानांचे ट्रेंड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. साडी, जोडीच्या फोटोनंतर आता "नथीचा नखरा' हा ट्रेंड सोशल मीडियावर भाव खातो आहे. मुलींनी आपले नथीचे फोटो समाजमाध्यमांच्या स्टेटसला ठेवण्याच्या ट्रेंडवर नेटकऱ्यांनी अनेक गमतीशीर मीम्स शेअर केले. मुलांनीही मुलींच्या या ट्रेंडला चिडवण्याची संधी समाजमाध्यमांवर सोडली नाही.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News