युवकांकडून बारालिंग देवस्थान परिसरात वृक्षारोपण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020
  • जानेवारी महिन्यात संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी भाजी भाकरीची परंपरा हे देवस्थानचे खास वैशिष्ट्य 

नांदेड : तामसा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र बारालिंग देवस्थाना परिसरात तामसा विचार मंचाकडून वृक्षारोपण करण्यात आले. तामसा भागासह नांदेड जिल्ह्यातील तसेच परराज्यातील भक्तांसाठी बारालिंग देवस्थान प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी भाजी भाकरीची परंपरा हे देवस्थानचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसन्न, निसर्गरम्य वातावरण वाटावे तसेच पर्यावरणाचे देखील संतुलन राखावे यासाठी तामसा विचार मंचच्या युवकांनी बारालिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अशोकाचे झाडे लावली आहे. याठिकाणी ५० हून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षांचे जतन करण्याची जबाबदारी देखील सदस्यांनी घेतली आहे. 

यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ समाजसेवक, डॉक्टर मंडळी, सर्व राजकीय मंडळी तसेच बारलिंग देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तामसा विचार मंचच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. तामसा गावातील युवकांनी एकत्र येऊन या ग्रुपची स्थापना केली आहे. तामसा विचार मंच हा नेहमीच गावाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम करत असतो. यापुढे देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच इतर उपक्रम देखील राबविण्याच मानस असल्याचे तामसा विचार मंच तर्फे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News