"झाडाखाली झाड वाढत नाही."

प्रकाश गोसावी
Wednesday, 5 June 2019

पूर्वापार एक गोष्ट सतत ऐकलेली....

झाडाखाली झाड वाढत नाही....

 

पूर्वापार एक गोष्ट सतत ऐकलेली....

झाडाखाली झाड वाढत नाही....

संदर्भ आहे मुलांच्या प्रगतीचा....
मुलांनी आईबापांपासून दूर जावे तरच 
ते आयुष्यात काही बनू शकतील....

जवळपास दहा वर्षे मी बँकेच्या विदेश
विनिमय विभागांत नोकरी केलेली....

मुलाला शिक्षणासाठी विदेशात पाठवतांना
उत्साहात असलेला बाप...

दोन वर्षांनीं शिक्षण आटोपल्यावर 
मुलाच्या परत येण्याची वाट बघणारा बाप...

मुलानी तिकडच्याच मुलीशी लग्न केल्यावर 
थाटात रिसेप्शन देणारा बाप...

मग मुलाला कधी गाडीसाठी तर कधी 
घर विकत घेण्यासाठी पैसे पाठवणारा बाप..

मुलानी आग्रह केला म्हणून चार सहा महीने
मुलाकडे जाऊन आलेला बाप.....

अशी एकाच माणसाची वेगळी रूपं मी
अगदी जवळून पाहिली आहेत....

हेच गृहस्थ एक दिवस माझ्याजवळ येऊन
बसले.

काहीसे इमोशनल वाटत होते....

मोबाईल मधले मुलाच्या घराचे, 
सुनबाईचे, नातवाचे फोटो दाखविले...

मुलाला ग्रीनकार्ड मिळाल्याचे सांगत होते....

मी म्हटलं, "बघा, आपण आयुष्यभऱात जितकं
कमावतो, तितकं मुलं पाच वर्षातच कमावतात."

म्हणूनच म्हणतात...

"झाडाखाली झाड वाढत नाही."

ते गृहस्थ अस्वस्थतेने म्हणाले,
"आज मला पैशाची नाही तर मुलाची गरज आहे.
परवाच बायकोला रात्री हॉस्पिटलाईज करावं लागलं, तेव्हा रात्री दोन वाजता बाहेर धावपळ करतांना जाणवलं की, आता आपलं शरीर साथ देत नाही, 
अशावेळी मुलगा जवळ असावयास हवा होता....

पुढे ते बोलून गेले,..

"एखादं तरी झाड झाडाखाली वाढू द्यावं..."

"भलेही ते फुलांनी बहरलेले नसू देत..."

"किमान देवपूजेपुरती फ़ुलं निघाली तरी चालेल."

आपलं कुणीतरी आपल्याजवळ आहे, 
ही भावनाच पुढचं आयुष्य जगायला पुरेशी आहे."

हा एक फक्त आलेला अनुभव लिहिला आहे..
प्रत्येकाच्या प्रायोरिटीज आणि विचार स्वतंत्र आहेत..
माझ्याच कित्येक मित्रांची मुलं परदेशी आहेत, आणि
ती मंडळी मजेत आहे..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News