केशारोपणासाठी हे उपचार...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019
  • या केसांचे आयुष्य २० ते २५ वर्षे असते. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच हे उपचार केलेले चांगले ठरते. अशा ठिकाणी रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असते. काही गुंतागुंत झाली.

केसं गळण्याचे कारण शोधण्यासाठी रक्ततपासण्या केल्या जातात. त्यानंतर होणाऱ्या निदानाप्रमाणे पुढील उपचार केले जातात. आनुवंशिकतेमुळे पडणाऱ्या टक्कलवर पोटात घेण्याची व वरून लावण्याची औषधे उपलब्ध आहेत, ही औषधे वैद्यकीय सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. औषधे कायम वापरावी लागू शकतात. काही रुग्णांमध्ये या उपचारांचा चांगला फायदा होतो. परंतु या औषधांनी काहीही फरक पडत नाही अथवा समाधानकारक बदल जाणवत नाही, अशा रुग्णांसाठी आता केशरोपण शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध आहे.

ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल होण्याची गरज पडत नाही. केशरोपण करणे जरुरीचे आहे फक्त तेवढ्याच भागावर भूल देऊन ती जागा बधिर केली जाते. रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर असतो व बोलू शकतो. डोक्‍याच्या पाठीमागील भागातील केसांच्या मुळांचे पुंजके सूक्ष्म हत्यारांच्या मदतीने वेगळे केले जातात.

टक्कल पडलेल्या जागी सूक्ष्म छिद्रे पाडून या मुळांचे रोपण केले जाते. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी या मुळांपासून केस वाढण्यास सुरवात होते. साधारण नऊ महिन्यानंतर केसांची वाढ पूर्ण होते. रोपण केलेले केस इतर केसांप्रमाणे कापता येतात व शाम्पू करता येतात. हे केस वेगळे उठून दिसत नाहीत. रोपणानंतर काही औषधे केसाच्या मुळांना लावावी लागतात. या केसांचे आयुष्य २० ते २५ वर्षे असते. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच हे उपचार केलेले चांगले ठरते. अशा ठिकाणी रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असते. काही गुंतागुंत झाली, तर त्वरित उपचार मिळणारी यंत्रणा कार्यरत असते. पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्येसुद्धा केशरोपण करता येते.

महत्त्व संतुलित आहाराचे
वैद्यकीय उपचारांइतकेच संतुलित आहाराचे महत्त्व आहे. केसांना पोषण देणाऱ्या घटकांचा आहारात समावेश असावा. प्रथिने नैसर्गिक स्वरूपात घ्यावीत. मांसाहारी पदार्थ, डाळी, मोडी आलेली कडधान्ये, सोया, पनीर या पदार्थांत प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. हिरव्या पालेभाज्या, सॅलड व फळे आहारात असावीत. सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. शक्‍यतो टॉवेलच्या साह्याने केस कोरडे करावेत. तेलाचा वापर कंडिशनर म्हणून होतो. केस गळण्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे केस रुक्ष असणाऱ्यांनी केसांना बाहेरून तेल लावावे.

खूप तेलकट केस असल्यास रोज शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. शाम्पूने केस जास्त गळतात हा निव्वळ गैरसमज आहे. शस्त्रक्रिया टाळायची असणाऱ्या तसेच वरून लावण्याच्या औषधांचाही फारसा उपयोग होत नाही, अशा रुग्णांसाठी हेअर पॅच अथवा वरून शिंपडण्याची काळसर रंगाची पावडर (फायबर) हे पर्याय उपलब्ध आहेत.

रक्तातील प्लेटलेट नावाच्या पेशींचे इंजेक्‍शन, लाइट थेरपी, डर्मारोलर अशा काही उपचार पद्धतीसुद्धा योग्य वेळेस वापरता येतात. अशा प्रकारे आपल्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या केशसंभाराकडे आपण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. केसांची निगा व समतोल आहार असेल तर औषधांचा योग्य तो परिणाम दिसून येतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News