माणसाला माणूस म्हणून पाहा

डाॅ राजेश बुरंगे
Friday, 9 October 2020

संत गाडगेबाबा आमचे आदर्श आहेत. त्यांची दशसूत्री आहे. त्यात ते म्हणतात “माणसाला माणूस म्हणून पहा”

ओळख एनएसएसचीः डाॅ राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

माणसाला माणूस म्हणून पाहा

कुमारी मातेची खूप मोठी समस्या आज समाजाला भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एनएसएसची टीम किती हिरीरीने सहभाग नोंदवत आहे याची माहिती अमरावतीच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समन्वयक राजेश बुरंगे यांनी यिनबझशी संवाद साधताना दिली.

मी २००९ पासून एनएसएस मध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून सक्रिय झालो आणि सलग १० वर्ष मी कार्यक्रम अधिकारी म्हणून राहिलो. मी स्वतः विद्यार्थी दशेत काम करत असताना, विद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये अंतर्गत रस्ते, शेततळे, बंधारा बनवणे ही कामे एकूण २७ एकरमध्ये केली. दत्तक गावांमध्ये “हागणदारी मुक्त गाव” ही संकल्पना  राबवली. घरोघरी जिथे शौचालये नाहीत तिथे श्रमदानातून शोषखडे निर्माण करून, सरकारचे १२,००० रुपयांचे अनुदान मिळवून दिले. २०१४ - १५ मध्ये मला विद्यापीठाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार मिळाला. माझ्या महाविद्यालयाला पण उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला. असे एकूण तीन पुरस्कार त्याच वर्षी मिळाले.

वृक्षरोपण, जलसंधारण, रस्ते सुधारणा, एड्स अवेअरनेस, रेड रिबन क्लब स्थापन, आपत्ती व्यवस्थापन  केले. २०१८ मध्ये अमरावती विद्यापीठाने मला जिल्हा समन्वयक केलं. मी जिल्हा समन्वयक असताना, कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी मला  विद्यापीठाच्या प्रभारी संचालकपदी नियुक्त केले. १८ महिने प्रभारी संचालक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं काम केलं. चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे आव्हान शिबीरात महाराष्ट्र स्तरावरचा पुरस्कार मिळाला. मेघना कोटक ही आमची विद्यार्थिनी एनएसएसकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर  बहरिनला गेली होती. पंतप्रधानांनी यूथ पार्लमेंट भरवली होती यात आमची एक विद्यार्थिनी दिल्लीला गेली. तिला पंतप्रधानांनी एक प्रश्न विचारायला वेळ दिला ही एक कौतुकास्पद बाब होती आमच्यासाठी. त्याला समर्पक उत्तरही त्यांनी दिले.

पाच जिल्ह्यांमध्ये एक लाख वृक्ष लागवड केली. योग दिवसाला ५००० चा प्रत्येक जिल्ह्याला समूह तयार केला आणि एकावेळी ५ जिल्ह्यांमध्ये उपक्रम घेतला. जलशक्ती अभियानामध्ये अमरावतीचे काही तालुके केंद्राच्या लिस्ट मध्ये ड्राय झोन मध्ये होते. त्यात आम्ही सहभाग घेऊन दत्तक खेड्यांमध्ये जलसंधारणाची कामे मे महिन्यात केली. जनजागृती रॅली काढल्या आणि त्या एका महिन्यामध्ये जी बुजलेली २०० गावांमधली शेततळी, बंधारे पुनर्जीवित केले. नंतरच्या पावसाळ्यामध्ये खूप मोठा जलसाठा निर्माण झाला आणि खूप यश आलं.

२५,४०० एकूण विद्यार्थी संख्या आहे. यात १२,६०० मुली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आम्हाला मुलांना पाठवायचं असेल तर ३-४ दिवस आम्ही तज्ज्ञांकडून, कुलगुरुंकडून प्रशिक्षण घेतो. महाविद्यालयाचे प्रशिक्षण शिबिर असते. ही तयार टीम पुढे पाठवतो. स्वछ आणि स्वस्थ भारत अभियान राबवतो आणि दर वर्षी १०-११ स्वच्छतेचे पुरस्कार पण देतो. दीड एकर जागेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारत आहोत, जे पुणे मुंबईला प्रशिक्षण दिलं जातं तेच आता इथे मिळणार आहे आणि याचा इतरही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

कोरोनाच्या काळातही जनजागृती केली आणि मुलांनी गावातच राहुन हे काम केलं. व्हाॅट्सअॅप, यूट्यूब वर प्रशिक्षण घेऊन मुलांनी काम केलं. जुन्या कपड्यातून २५००० मास्क शिवणे, धान्य वाटप, फूड पॅकेट वाटण्यात आले. पोलीस मित्र, आरोग्यदूत, निर्जंतुकीकरण फवारणी केली. मुलांचं कौतुक खूप झालं. महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, मंत्री यांनी भरभरून पत्र पाठवून मुलांचं कौतुक केले. चीफ मिनिस्टर फंडमध्ये आपत्ती व्यवस्थापन निधीतून २२.६० लाख रुपये दिले.

कोरोनामुळे  कुलगुरुंनी संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियान सुरु केलं. १४-१५ दिवस विलगीकरण कक्षातील लोकांची मानसिक स्थिती नीट राहण्यासाठी १५० प्राध्यापक समुपदेशनासाठी प्रशिक्षण देण्यात आले. आणि फोन वर समुपदेशन करून लोकांना धीर देण्याचं काम केलं. काही लोकं अशी आहेत कि त्यांना कौटुंबिक सहायता मिळत नाही. त्यावेळी आमचे हे स्वयंसेवक तिथे काम करतात. संत गाडगेबाबा आमचे आदर्श आहेत. त्यांची दशसूत्री आहे. त्यात ते म्हणतात “माणसाला माणूस म्हणून पहा”, आणि “Not me but you” या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी संस्कार दिले तर समाज एक नवनिर्मितीचा माध्यम आहे.

यवतमाळ जिल्ह्याचा पंढरकवळा, झरी झामणी हा दुर्गम आदिवासी भाग आहे. या भागामध्ये कुमारी मातेचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना आधार नाही. यामुळे ११ विद्यालयांचे एनएसएस कक्ष तिथे बांधण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देऊन कुमारी मातांच्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी संस्कार शिबीर आयोजित केले. महिलांना प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण दिले. काही कुमारी मातांचे लग्न लावून संसार बसवून दिले आहेत. त्या भागामध्ये काही बाहेरचे लोक मजुरीसाठी येतात काही दिवस राहतात आणि त्यातून हा प्रकार घडतो. आणि मग ती बाहेरची माणसं परत जातात. त्यामुळे इथल्या स्थानिक मुली यात ओढल्या जातात. महाराष्ट्र स्तरावर याची चर्चा मोठी आहे. सरपंच, डीएसओ, प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने एनएसएसची टीम तिथं काम करते.

शासनाच्या योजना समजावून घेऊन त्या पुरवल्या, अडचणी सोडवल्या. यात तिथले प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी, गावकरी, लोकप्रतिनिधी सहभागी होते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. आपण गरीब नाही, आणि आपण श्रम करून पैसे मिळवू शकतो. पैसे मिळाल्यावर कुठल्या व्यसनामध्ये न अडकता, आपली मुलं आपला संसार याच प्रथम विचार करायला शिकवतो. संस्कार शिबीर राबवतो. कुटुंबावर प्रेम करायला शिकवतो. याने तुम्ही एकजूट व्हाल, तिथल्या महिला पण सुरक्षित होतील. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी रॅली काढतो. रोजगार संदर्भात कार्यशाळा घेतल्या. उन्नत भारत अभियान राबवतो. गाव दत्तक घेऊन ज्या गावात जे चांगले पदार्थ आहे त्याचं उत्पादन स्थानिक पातळीवर कसे होईल हे पाहिलं. त्याला चांगलं यश येत आहे. ग्रामस्थ आमच्या सोबत जोडले आहेत. आमचे आदर्श संत गाडगेबाबा असल्याने खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहोत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News