वयाच्या 13व्या वर्षापासून पुण्याची बुधवारपेठ ते संसारापर्यंतचा प्रवास

सुरज पाटील (यिनबझ)
Monday, 13 May 2019

देशात अशा कित्येक महिला आहेत, ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे हतबल होऊन जी मिळेल ती नोकरी किंवा कोणता ना कोणत्या व्यवसाय करावा लागतोय. अशाच एका वयाच्या तेराव्या वर्षी पुण्याच्या बुधवार पेठेत मजबूरीने आलेल्या एक यशवंत महिलेचा हा प्रवास...

देशात अशा कित्येक महिला आहेत, ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे हतबल होऊन जी मिळेल ती नोकरी किंवा कोणता ना कोणत्या व्यवसाय करावा लागतोय. अशाच एका वयाच्या तेराव्या वर्षी पुण्याच्या बुधवार पेठेत मजबूरीने आलेल्या एक यशवंत महिलेचा हा प्रवास...

कर्नाटकातील जमंडी जवळच्या एका गावामधून अंधश्रध्देला बळी ठरलेली एक मुलगी. देवदासीच्या नावाखाली घरच्यांनी तीला देवीच्या डोंगरात नेऊन सोडले. तेथून ती पुण्याच्या बुधवारपेठेत आली... 

चेहऱ्यावर छानसा मेकअप करून दाराबाहेर ऊभे राहायचे आणि शरिराची भूक भागवण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून पैसे घेऊन ती घरी पाठवत असे. हा सगळा देहव्यवहार सुरू असताना, तीथल्याच एका किराणा दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराला ती पसंत पडली. ज्यावेळी ही गोष्ट त्या मुलाने तीच्याजवळ मांडली त्यावेळेला ती प्रेमसंबंधाला तयार झाली खरी पण तीने वेश्या व्यवसाय सोडण्यास नकार दिला. हे सर्व त्या तरुणाला मान्य होतं, त्यावेळी त्यांनी एकत्र पैशे साठवायला सुरूवात केली. 

गरजेची असलेली रक्कम जमा झाल्यानंतर मात्र त्यांनी वेश्यावस्ती सोडायचा निर्णय घेतला आणि पुण्याच्या दक्षिण भागात जाऊन भाड्याने घर घेतले. त्यादरम्यान त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन आपत्य झाली. मुलांना संस्कार आणि त्यांना समाजात एक वेगळं स्थान देण्यासाठी त्या मुलीने आपला वेश्या व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला. 

वेश्या व्यवसायाबद्दल तिच्या मुलीला समजल्यानंतर कोणतीही तक्रार न करता त्या उलट तिने आपल्या जिद्दीवर डॉक्टरकीची परिक्षा पास होऊन आपलं ठरवलेलं स्वप्न पूर्ण केलं. एकंदरित परिस्थितीवर मात करण्याची ताकद जरी सर्वांमध्ये नसली तरी कोणत्याही परिस्थिती ध्येय साध्य करण्याची जिद्द सगळ्यांमध्ये आली पाहिजे, हीच गोष्ट यावरून स्पष्ट होते.... 

कोवळ्या वयात कोणताही अपराध न करता शिक्षा भागावी लागणाऱ्या तरुणीने आखीर आपल्या मुलीला मात्र यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News