कोल्हापूरचा प्रवास; अंबाबाई, जोतिबा ते आंब्याच्या सफारीपर्यंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019

मे महिना सुरू झाला आणि उन्हाळी पर्यटनाला बहरही येऊ लागला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. ​

मे महिना सुरू झाला आणि उन्हाळी पर्यटनाला बहरही येऊ लागला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ लागले आहेत. शहरात श्री अंबाबाई आणि जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शहरापासून अवघ्या ८० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात माणसांनी फुललेल्या खास पर्यटन डेस्टिनेशन्सविषयी...

जोतिबा अन्‌ पोहाळ्याची लेणी!

दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनाबरोबरच डोंगर पठारावरील ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या लेण्यांमध्ये पांडवांचे सभागृह, मनोरंजनासाठी नाट्यगृह, नक्षीचे खांब, दिवाणखाना, बैठकीसाठी ओटी, पिण्याच्या पाण्याचे गोड झरे, तसेच प्रत्येक खांबावर कलाकुसर या सर्वच गोष्टी एकाच दगडावर कोरलेल्या आहेत.

या लेण्यांमध्ये छोटे महादेव मंदिर आहे. जोतिबा डोंगरासभोवती असणाऱ्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे मंदिर आहे. याचे नाव औंढ्या नागनाथ आहे. या लेण्यांच्या सौंदर्याची भुरळ भाविक व पर्यटकांना पडतेच पडते. हा लेण्यांचा परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे. हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात होते.

पूर्वी ही लेणी दुर्लक्षित होती. गेल्या सात-आठ वर्षांपासून या लेण्यांची डागडुजी व इतर कामे भारतीय पुरातत्त्व खात्याने केली. त्यामुळे या परिसराला सौंदर्य प्राप्त झाले आहे. या लेण्यांचे पावसाळ्यातील सौंदर्य आगळेच भासते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News