ट्रॅव्हलदरम्यान कसे फिट राहाल?

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 4 February 2019

आजकालच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकजण स्वत:च्या सक्सेससाठी धावपळ करीत असतात. अशात त्यांचा आरोग्याकडेपुरते दुर्लक्ष होते. मात्र अनेक युवा असेआहेत जे आपल्या फिटनेससाठी क्रेझी आहेत. ते घरात असो की बाहेर प्रत्येक ठिकाणी आपल्या आरोग्यासाठी सतर्क असतात. त्यासाठी ते सातत्याने एक्ट्रा एफर्टस घेतात.

     ट्रॅव्हलदरम्यान आपल्याला नेहमीच विविध गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. यामध्ये सर्वात आधी प्रश्न येतो तो फिटनेसचा..! प्रवासादरम्यान खाणं-पिणं योग्य असेल तर काही समस्या येत नाही. या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या प्रवासादरम्यात होणाऱ्या फिटनेसच्या समस्या आपण टाळू शकतो. 
     आपले स्नॅक् सस्वत:च पॅक करून सोबत घेऊन जावे. स्मार्ट आणि पोर्टेबल गुडस पॅक करावे. पुन्हा वापरता येण्यायोग्य कन्टेनर्स, ड्रायफ्रुट्स, काबुली चने, पीनट बटर. अधिक वेळेपर्यंतचा प्रवास असला तरी खराब न होणारे फळ उदा. केळी, सफरचंद इत्यादी. ट्रिप दरम्यान फ्रेश राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. तसेच प्रवासा दरम्यान केवळ बॉटलबंद पाणीच प्यावे. तुम्ही प्रवास करीत असाल तर एखाद्या ग्रॉसरी शॉपमध्ये जाणे तुमच्यासाठी एक चांगला सांस्कृतिक अनुभव ठरू शकतो.
     जर तुम्ही ग्रॉसरी स्टोअरमधून खाण्यापिण्याच्या वस्तूखरेदी करीत असाल तर तुमच्या भरपूर कॅलरीज आणि पैशांची बचतच होईल. बस, टॅक्सी किंवा ट्रेनने प्रवास करीत असाल तर सोबत सॅनिटायजर नेण्यास विसरू नका. हे हातावरील इन्फेक्शन हटविण्यासाठी याची भरपूर मदत होईल. यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येईल. प्रवासादरम्यान अधिक चटपटीत पदार्थखाणे टाळावे. हे तुमच्या पोटासाठी बाधक ठरू शकते. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छता असेल तेथेच जेवण किंवा नास्ता करावा. 
     आजकालच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकजण स्वत:च्या सक्सेससाठी धावपळ करीत असतात. अशात त्यांचा आरोग्याकडेपुरते दुर्लक्ष होते. मात्र अनेक युवा असेआहेत जे आपल्या फिटनेससाठी क्रेझी आहेत. ते घरात असो की बाहेर प्रत्येक ठिकाणी आपल्या आरोग्यासाठी सतर्क असतात. त्यासाठी ते सातत्याने एक्ट्रा एफर्टस घेतात. घरात असताना आपण एक फिक्सरुटिन पाळतो. मात्र प्रवासाला निघाल्यास संबंध शेड्यूल विस्कळित होतो. अशात खाण्यापिण्यावर नियंत्रण राहत नाही. तसेच व्यायामाकरिता पुरेसा वेळही काढता येत नाही. मात्र तुम्ही ठरवलं तर प्रवासादरम्यान किंवा एखाद्या सहलीला जाताना सुद्धा तुम्ही फिट राहू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News