मुंबईकरांच्या प्रवासातील अडचणी दूर होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आढावा घेतला.

मुंबई : राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आढावा घेतला.बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीमती सोनिया सेठी आणि डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकरे यांनी ट्रान्स हार्बर लिंक, वेस्टर्न एक्‍स्प्रेस हायवे आणि मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पाससह एमएमआर प्रदेशात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. 1 हजार 276 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाने 3 वर्षांत बांधल्या जाणाऱ्या शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्‍टरच्या कामाच्या प्रगतीवर बैठकीत चर्चा झाली. 4 लेन कॅरिजवेसह असलेले हे एलिव्हेटेड व्हायडक्‍ट कनेक्‍टर हे शिवडी रेल्वेस्थानकाजवळील रफी अहमद किडवई रोड व आचार्य दोंडे मार्ग आरओबी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकासोबत जोडणी प्रदान करेल.

मुंबईकरांना दिलासा
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली, एमएमआर प्रदेशात कुठेही प्रवास, टोल, पार्किंग फी, किरकोळ व्यवहार इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्ड आधारित प्रणालीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच येत्या काही वर्षात मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पासमुळे शहर व उपनगरामध्ये व्यापक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून मुंबईकरांसाठी प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
......................................

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News