संवादांचे पाठांतर.. अन्‌ अभिनयाची रंगीत तालीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 February 2020

जळगाव : ‘सकाळ-एनआयई’तर्फे सोमवारी आंतरशालेय नाट्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी बारा शाळांमध्ये रंगीत तालीम सुरू असून, स्पर्धेत यश मिळविण्यासाठी बालकलावंत जोरदार सराव करीत आहेत. अभिनय, संवाद पाठांतरावर अधिक भर दिला जात आहे.  

जळगाव : ‘सकाळ-एनआयई’तर्फे सोमवारी आंतरशालेय नाट्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी बारा शाळांमध्ये रंगीत तालीम सुरू असून, स्पर्धेत यश मिळविण्यासाठी बालकलावंत जोरदार सराव करीत आहेत. अभिनय, संवाद पाठांतरावर अधिक भर दिला जात आहे.  

या स्पर्धेत विविध शाळांमधील बारा संघ सहभागी झाले आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी जोमात तयारी सुरू केली आहे. नाटकातील पात्रांचे संवाद पाठ करणे, संवाद फेकीचे कौशल्य आत्मसात करणे, अभिनय उत्कृष्ट कसा होईल, याची शास्त्रशुद्ध पद्धतीने तालीम केली जात आहे. प्राथमिक फेरी व त्यानंतर स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल. सहभागी नाटकांमधून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येणार आहेत.

अशी असतील बक्षिसे
विजेत्यांना प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट लेखन यांना देखील पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

स्पर्धा संयोजनाचे सर्व अधिकार ‘सकाळ-एनआयई’कडे असणार आहेत. स्पर्धेत अभिनय नाटिकेचा विषय, आशय यांच्या आधारे गुणांकन केले जाईल. अधिक माहितीसाठी हर्षदा नाईक ( ९५७९४८५०१३) यांच्याशी संपर्क साधावा.

...या शाळांचा सहभाग
काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, बीयूएन रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, उज्ज्वल स्प्राउटर स्कूल, ब. गो. शानभाग विद्यालय, बारी समाज माध्यमिक विद्यालय (शिरसोली), ए. टी. झांबरे विद्यालय, प्रगती विद्यामंदिर, मानवसेवा माध्यमिक विद्यालय, बीयूएन रायसोनी मराठी शाळा, नानासाहेब आर. बी. पाटील माध्यमिक विद्यालय, स्कॉलर इंग्लिश मीडियम स्कूल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News