परिवर्तनवाद : डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य

प्रा. किशन पवित्रे, नांदेड
Saturday, 1 August 2020
  • महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक महापुरुषाचा जन्मला झाला, त्यापैकीच एक म्हणजे साहित्याचा महामेरू, विश्व साहित्यिक, तथा वास्तववादी साहित्याचे जनक डॉ. अण्णाभाऊ साठे होत.
  • डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या सध्याच्या खेड्यांमध्ये झाला.

महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक महापुरुषाचा जन्मला झाला, त्यापैकीच एक म्हणजे साहित्याचा महामेरू, विश्व साहित्यिक, तथा वास्तववादी साहित्याचे जनक डॉ. अण्णाभाऊ साठे होत. डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या सध्याच्या खेड्यांमध्ये झाला. घरची आर्थिक परिस्थिती दैनीय होती. सहाजिकच ज्या समाजात ज्या जातीमध्ये झाला, ती जात म्हणजे गावा कुसा बाहेर असणारी जात होय. या समाजाच्या समस्या अतिशय गंभीर होत्या. या समाजाला सर्व अधिकार नाकारण्यात आलेले होते त्यामध्ये शिक्षण सुद्धा घेणे फार अवघड होईल अशा परिस्थिती वडील भाऊराव साठे आणि आई वालुबाई साठे यांना शिक्षणाची आवड होती.

त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना शाळेमध्ये दाखल करण्यात आले शाळेचा पहिलाच दिवस डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी अवघडच ठरला. जातिव्यवस्थेने बरबटलेल्या समाजामध्ये शिक्षण घेणे हे अत्यंत कठीण बाब होती. शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेत असताना शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठ पूर्ण करून सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना अतिशय गंभीर मारहाण करण्यात आली तेव्हाच डॉ. साठे यांनी आपल्या शालेय जीवनाला पूर्णविराम दिला. तिथूनच मग अण्णाभाऊ साठे यांच्या डोक्यामध्ये परिवर्तन वादाची ठिणगी पडली. आपल्या अनुभवाच्या विद्यापीठात स्वतः शिक्षण घेण्यास सुरुवात केले,  मग बस चपात्या वाचून वेगवेगळे बोर्ड वाचून स्वतः शिक्षक,  आणि स्वतः विद्यार्थी अशी भूमिका घेऊन डॉ. अण्णाभाऊ यांनी मुंबईची वाट धरली मुंबई मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिली भेट कोळशाच्या खाण्यातील कामगारांसी आणि गिरणी कामगारांसी झाली. तिथे अण्णाभाऊसाठे स्वतः काम करत होते त्यामुळे त्यांना कामगारांचे प्रश्न डोळ्यांनी पाहता आले त्याचा अनुभव घेता आला. त्यावेळेस होणारी कामगारांची पिळवणूक हे सगळं पाहून अण्णाभाऊ च्या अंगातील साहित्यिक जागा झाला मग कामगारांच्या हक्कासाठी मोर्चे काढणे आंदोलने करणे तसेच आपल्या साहित्याच्या माध्यमातून कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी आपले साहित्य खर्च केले.

डॉ.अण्णाभाऊ साठे वास्तववादी लेखक होते त्यांनी कधीही आपल्या साहित्यामध्ये कल्पनेला वाव दिला नाही.

 "मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारण्याची सवय नाही.

त्याबाबत मी स्वतःला बेडूक समजतो मी जे अनुभवतो जगतो तेच लिहीतो."

 कामगार, कष्टकरी, दलित शोषित, यांच्या जीवनाचा अनुभव घेत असताना, त्यांनी कधीही आपल्या साहित्यामध्ये लिहीत असताना जो नायक असायचा तो वंचित शोषित समाजातील असायचा. ज्यावेळेस १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ ऑगस्ट १९४७ ला मोर्चा काढून आपल्या भाषणामध्ये डॉ. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते.

    "यह आझादी झुठी है!

देश कि जनता भुकी है!"

म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की, या स्वातंत्र्याचा दलित, वंचित, शोषित जे गावा कुसा बाहेर आहेत त्यांना जातिव्यवस्थेने, धर्मव्यवस्थेने आणि वर्णव्यवस्थेने पीळले आहे. त्यांना या स्वातंत्र्याचा फायदा होणार आहे का? असा प्रश्न त्यांनी आपल्या मोर्चाच्या माध्यमातून मांडला होता. तोच प्रश्न आजही जशास तसा खरा वाटायला लागतो. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनवादी साहित्य आहे. असे म्हटल्या जाते की, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आणि आरसा कधी खोटं बोलत नाही, डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे वास्तविक साहित्य त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, नाटक हे सगळं साहित्य त्यांनी मनोरंजनासाठी कधी लिहिले नाही. त्यामध्ये समाजातील प्रश्न मग आर्थिक सामाजिक,  राजकीय, सांस्कृतिक धार्मिक अशा सर्व प्रश्नांचा प्रमांस त्यांच्या साहित्यामध्ये वाचायला मिळतो. प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य अण्णाभाऊ आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडत असे.

डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या, शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक पोवाडे, लावणी लिहिल्या आणि सादर केल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. याचा उल्लेख इतिहासकारांनी केला नाही की, विसर पडला हे माहीत नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाबतीत डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी एक लावणी लिहिली ती म्हणजे...

 "माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीय काहिली"

पण हल्लीच्या काळात समाज व्यवस्थेचा विचार केला तर, चित्र मात्र वीचित्र दिसायला लागतं. आज समाजामध्ये प्रत्येक महापुरुषांना एका समाज किंवा जातीपुरते मर्यादित करण्याचे काम होत आहे. महापुरुषांना डोक्यावर न घेता, डोक्यात घेण्याचे काम झाले पाहिजे. यावर कुठेतरी विचारमंथन झाले पाहिजे. विशिष्ट जातीच्या लोकांनी विशिष्ट महापुरुषांची जयंती साजरी करावी,  हा विचार महापुरुषांच्या विचारांचा त्यांच्या कार्याला छोटं करणारा आहे. असे मला वाटते,  महापुरुष किंवा कोणतेही समाज सुधारक एका विशिष्ट जाती धर्माचे किंवा एका समाजाचे नसतात. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपला आयुष्य खर्च केलेले असतात. म्हणून हा संकुचित विचार समाजातील जाणकार व्यक्तीने सोडला पाहिजे. आणि विशिष्ट महापुरुष विशिष्ट समुदायाचा आहे त्यावर आमचा अधिकार आहे. ही मानसिकता बदलली पहिज

प्रत्येक महापुरुष हे सूर्य-चंद्र हवा, पाणी याप्रमाणे आहे. त्यांच्या कार्याला त्यांच्या विचारांना संकुची त  करणे उचित नाही. प्रत्येक महापुरुषांचे विचार कार्य संपूर्ण समाजासाठी आहे. आणि त्यांच्यावर संपूर्ण समाजाचा अधिकार आहे. दोन हजार वीस वर्षे डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष या वर्षात तमाम समाज बांधवानीअण्णाभाऊचे विचार अंगीकारून आचरणात आणावे,  अण्णा भाऊंना व त्यांच्या विचारांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन,  त्यांच्या विचारांची त्यांच्या कार्याचा त्यांच्या साहित्याचा अभ्यास व चिंतन करून आपले सामाजिक वर्तन करावे एवढीच अपेक्षा...

शासनाने डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. अण्णा भाऊ यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे. तसेच मुंबई विद्यापीठाला डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे.

शेवटी अशा साहित्याच्या अथांग सागराला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

जय भिम, जय लहूजी, जय अण्णा…!!

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News