राज्य सरकारने केल्या चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • राज्य सरकारने चार प्रशासकीय (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, राजीव जलोटा यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने चार प्रशासकीय (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, राजीव जलोटा यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवपदी;तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जोडीला जलज शर्मा यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News