शुटिंगच्यावेळी सलमानच्या खूपच जवळ आली होती ट्रेन; असा वाचवला जीव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020

बाकीच्या अ‍ॅक्शन हिरोंप्रमाणेच अ‍ॅक्शन सीन दरम्यान सलमान खानने एकदा जीवाचा धोका पत्करला होता, असाच एक सलमान खानचा अ‍ॅक्शन सीन मोठ्या प्रमाणात चर्चेत ठरला होता. 

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहे, ज्याच्या चाहत्यांना त्याला अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला खूप आवडते. "एक था टायगर" ते "दबंग" सिनेमापर्यंत त्याने आपल्या कारकीर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यात तो जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसला आहे.

परंतु जेव्हा अ‍ॅक्शन होते तेव्हा दुखापत होण्याचीही शक्यता असते. बाकीच्या अ‍ॅक्शन हिरोंप्रमाणेच अ‍ॅक्शन सीन दरम्यान सलमान खानने एकदा जीवाचा धोका पत्करला होता, असाच एक सलमान खानचा अ‍ॅक्शन सीन मोठ्या प्रमाणात चर्चेत ठरला होता. 

ही बाब सन 2003 ची आहे जेव्हा सलमान तेरे नाम चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व्यस्त होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता पण या चित्रपटाच्या एका दृश्यात सलमानचा जीव थोडक्यात बचावला होता. एका रिपोर्ट्सनुसार सलमान खानला घटनास्थळी रेल्वे रुळावरुन चालत जावं लागलं होतं आणि ट्रेन मागून येणार होती. पुढे असे घडले की, या दृश्यात सलमान एवढे गुंतून गेला की, ट्रेन त्याच्या एवढ्या जवळ आलीय, त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. 

दबंग खानला हे समजले नाही की ट्रेन सतत त्याच्या जवळ येत आहे .मात्र परिस्थिती बिघडू लागली तेव्हा शूटिंगच्या काही क्रूने धैर्याने सलमानला ट्रॅकवरून दुसऱ्या बाजूला ढकलले.

सलमान खान सध्या पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो येथे बंद आहे. तसेच, आपल्या रिअल लाईफमधील आई-वडिलांशी व्हिडीओ कॉलद्वारे गप्पा मारत आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायाचं तर, दबंग 3 नंतर त्याच्या आगामी राधे या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते पण लॉकडाऊनमुळे सर्व काम बंद आहे.

कोरोना विषाणूमुळे चित्रपटाच्या जगावर वाईट परिणाम झाला आहे. ना नवीन चित्रपटांचे शूटिंग होत आहे ना तयार झालेले चित्रपट रिलीज होत आहेत. दर्शक देखील केवळ वेब स्ट्रीमिंग पोर्टलवर अवलंबून राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांच्या सुरक्षेचा विचार करता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका बॉलिवूडकरांना देखील बसला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News