विकी कौशलचा थरार आणणारा 'भूत' चित्रपटाचा ट्रेल प्रेक्षकांच्या भेटीला  

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 3 February 2020
  • करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा पहिला भूताचा चित्रपट 'भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
  • या चित्रपटाच्या पहिल्या लुकमुळे आधीच उत्साह वाढला होता.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा पहिला भूताचा चित्रपट 'भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या लुकमुळे आधीच उत्साह वाढला होता. आता त्याचा ट्रेलर पाहून आपण निराश होणार नाही. बर्‍याचदा भुताटकीच्या कथांमध्ये आपण एका निर्जन भागात घरात भयानक कथा पाहिल्यात. परंतु या चित्रपटाची सर्वात जास्त प्रभाव पडणारी बाब म्हणजे ती एका चढ्या जहाजाची, म्हणजेच मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या पाण्याच्या जहाजाची गोष्ट आहे. या चित्रपटात विकी कौशल शिवाय भूमी पेडणेकरसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण, ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरची एक झलकदेखील दिसली नाही.

चित्रपटाची गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये सीबर्ड नावाच्या जहाजाच्या ट्रेलरमध्ये वादळानंतर मुंबईच्या किनाऱ्यावर येते, पण या जहाजात एकही माणूस अस्तित्वात नाही. या भयानक जहाजाचे सर्वेक्षण अधिकारी पृथ्वी या भूमिकेत अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. विकीला या जहाजाची तपासणी करताना खूपच भयानक अनुभव आले आहेत.  

करण जोहर आणि शशांक खेतान एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप' चे दिग्दर्शन भानु प्रताप सिंह यांनी केले आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News