तिची शोकांतिका...

सुनिल पवार
Wednesday, 28 August 2019

मुक्ती शक्ती सर्व मान्य पण
आधी व्याप्ती तर समजून घे
द्वेष सुद्धा जालीम विष आहे
आधी त्याला फेकून दे!

प्रेमाची निस्सीम फुलेही उधळणारे
आहेत ह्या जगात
पण तुलाच जगायचं आहे
तुझ्या नकारात्मक विश्वात!

हा अनुभव तुझा एकटा दुकटा
प्रत्येकाचा असेल असे नाही
फेकून दे मुखवटा अन् पहा आरशात 
चेहरा इतकाही भयावह नाही!

खरं तरं त्याने दाखवले अन् तू पाहिले
सत्य केवळ इतकेच असावे
हा दोष तुझ्या सोशिकतेचा
बाकी सर्व मिथ्य असावे!

मुक्ती शक्ती सर्व मान्य पण
आधी व्याप्ती तर समजून घे
द्वेष सुद्धा जालीम विष आहे
आधी त्याला फेकून दे!

नाही! दोष तुझा नाही
दोष खरा दृष्टिकोनाचा आहे
मानसिकता अजूनही बदलत नाही
हीच खरी शोकांतिका आहे!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News