करोडपतींपासून गरिबांच्या स्वागतासाठी उभा असलेला टाऊन हॉल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • १८० वर्षे जुना व मुंबईतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाचा साक्ष देणारं सभागृह म्हणजे ‘टाऊन हॉल’.
  • हर्निमल सर्कलसमोर दिमाखात उभी असलेली ही इमारत. या हॉलच्या पाय-यांची संख्या ३० असून समोरच्या भागात तुस्कान डोरिक पद्धतीचे ८ खांब आहेत.

१८० वर्षे जुना व मुंबईतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाचा साक्ष देणारं सभागृह म्हणजे ‘टाऊन हॉल’. हर्निमल सर्कलसमोर दिमाखात उभी असलेली ही इमारत. या हॉलच्या पाय-यांची संख्या ३० असून समोरच्या भागात तुस्कान डोरिक पद्धतीचे ८ खांब आहेत.

नियो क्लासिकल शैलीतील इमारत असून या इमारतीचे बांधकाम कर्नल कॉऊपर व कर्नल बॅडिग्टन यांनी केले आहे. हॉलमध्ये प्रवेश केल्यास मुख्य भाग दिसतो तो येथील सुंदर दरबार आहे. हॉलच्या पूर्वेकडील भागात एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय आहे.

या ग्रंथालयात देशी-विदेशातील ८ लाखांवर दुर्मिळ ग्रंथसंपदा असून या ग्रंथालयाचा उपयोग अनेक संशोधकांना आणि अभ्यासकांना होतो. त्याचबरोबर या ग्रंथालयात मुघल राजा अकबर याच्या काळातील १००० नाणे म्हणजे मोहरा आहेत.

या हॉलमध्ये मुंबईच्या विकासाला हातभार लावणाऱ्या गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन , मुख्य जज्जस्टिफन नॅबिग्टन, गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन , सर जमशेटजी जिजिभाई , जगन्नाथ शंकरशेठ, गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या व्यक्तींचे पुतळे आहेत.

वेस्टर्न रेल्वेच्या चर्चगेट स्थानक व छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानक या दोन्ही स्थानकावरून हे जवळ आहे. टाऊन हॉल हा सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत खुला असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News