दौरा महाराष्ट्राचा आणि आढावा जनतेचा...

सुरज पाटील (यिनबझ)
Friday, 4 October 2019

पत्रकारितेच्या सुरूवातीलाच अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि मी भाग्यवान झलो. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं अनेकांचं स्वप्न आज स्वप्नच आहे, मात्र स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं असं सत्य आज माझ्यासमोर उभं आहे. सकाळ समुहाच्या माध्यमातून दौरा करण्याची सर्वोत्तम संधी मला मिळाली. संपादक संदीप काळे सर, सहकारी हर्षल भदाणे, सार्थी म्हणून सोबत असलेला प्रकाश आणि मी असे चौघेजण निघालो महाराष्ट्र दौऱ्याला. 

पत्रकारितेच्या सुरूवातीलाच अख्ख्या महाराष्ट्राचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि मी भाग्यवान झलो. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं अनेकांचं स्वप्न आज स्वप्नच आहे, मात्र स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं असं सत्य आज माझ्यासमोर उभं आहे. सकाळ समुहाच्या माध्यमातून दौरा करण्याची सर्वोत्तम संधी मला मिळाली. संपादक संदीप काळे सर, सहकारी हर्षल भदाणे, सार्थी म्हणून सोबत असलेला प्रकाश आणि मी असे चौघेजण निघालो महाराष्ट्र दौऱ्याला. 

अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर असा महाराष्ट्र दौऱ्याचा एक टप्पा पुर्ण झाला. एकंदरित १३ जिल्हे, १२९ तालुके, ८४ विधानसभा मतदार संघाचा आढावा मला घेता आला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश असा की विधानसभेच्या पूर्वी नेत्यांची, नेत्यांच्या मागे धावणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि सामान्य जनतेची सध्या परिस्थिती कशी आहे? नेमकं मोदी लाटेचा, कलम ३७० चा, सर्जिकल स्ट्राईकचा, महाजनादेश यात्रेचा, मराठा आंदोलन, मेगाभरती, राष्ट्रवादीतलं अंतर्गत धुमसतं राजकारण, बी टीम असे असंख्य प्रश्न एकीकडे, तर शेतकरी कर्ज माफी, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, रोजगार, पीक विमा, पीक कर्ज, अतिवृष्टी, बंद पडलेले कारखाने, विकास अशा अनेक बाजूने यावेळी अभ्यास करता आला. या सगळ्या प्रश्नांचा येणाऱ्या विधानसभेला घेऊन काय परिणाम होईल हे पाहाणे जितकं रंजक ठरले तितकचं निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रातलं ढवळतं राजकारण पाहाणेही मनोरंजकच असेल हे नक्की. काही ठिकाणी भाजपाचे नेते कोणत्याच ग्राऊंड लेवलला पोहचले नाहीत, मात्र मोदी संपूर्ण घराघरात पोहचलेत, यात तिळमात्र शंका नाही.

नगरमध्ये भर पावसाळ्यात चारा छावण्या सुरू आहेत. त्याच नगरमध्ये कोपर्डीची घटना घडूनदेखील स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न अजून कायम आहे, सगळ्याप्रमाणे त्या ठिकाणीही रोजगाराचा प्रश्न गंभीर आहेच; पण यामुळे चोरी, दरोडे, लुटमार अशा गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वाढ गेल्या २ ते ३ वर्षात झाली आहे. सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे सगळ्यात जास्त कारखाने आहेत, त्या ठिकाणीसुध्दा सगळ्या तरुणांचं कार्यकर्त्यांत रुपांतर होताना दिसत आहेत, कारण कोणत्याच प्रकारे IT कंपनी या भागात परतली नसल्याने भाजपाचं या भागातलं सगळ्यातं मोठ अपयश मानलं जात आहे. 

नंदूरबारसारख्या ठिकाणी शिक्षणाच्या नावाने बोंब आहे; पाचवीपर्यंत शिक्षण झालं की तिथली मुलं शिक्षणाचा नाद सोडून गुटख्यासोबतच बाजारात हमाली करत फिरतात. हे खूप भिषण वास्तव डोळ्यासमोर येऊन ऊभं राहातं. अजूनपर्यंत फिरलेल्या सगळ्या मतदार संघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महत्वाचे प्रश्न म्हणजे तिथले रस्ते, पाणी, वीज आणि तिथूनपूढे प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे तिथल्या स्थानिक तरुणांसाठीचा रोजगार. खूप ठिकाणी “तुमच्या जिल्ह्यात भाजपाने काय केलं?” असा प्रश्न विचारला असता, भाजपाने अजूनपर्यंत फक्त प्रपोगेंडा केल्याचे उत्तर मिळाले.” गेली पाच वर्ष भाजपाने जरी मागच्या सर्व परिस्थितीला सावरण्याचं काम केलं असेल (असं भाजपाचे नेते सांगतात) तरी आता केंद्रात सत्ता आल्याने भाजपाने स्थानिक पातळीवर मोठा बदल करणे गरजेचे आहे, नाहीतर भारतीय नागरिक कॉंग्रेससारखं साठ वर्षे सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात मिळणार नाही, हेदेखील महत्वाचे आहेच.
 
देशात शेतीला घेऊन जरी लोकांनी केंद्राच्या नावाने शिमगा केला असला तरी माझ्या मते त्या त्या राज्यातले शेतीचे प्रश्न हे त्या त्या राज्य सरकारच्या अख्तारीत सुटू शकतात, त्याचा अनुभव मला नंदूरबारहून गुजरातच्या सिमेवर गेल्यानंतर समजलं. मध्यप्रदेशमधून आलेली, महाराष्ट्राला आशिर्वाद म्हणून लाभलेली आणि तशीच ती गुजरातमध्ये गेलेली तापी नदी. मध्यप्रदेश आणि गुजरातने या नदीचा जितका होईल तितका फायदा करून घेतला आहे, मात्र महाराष्ट्र सरकारला तो करून घेता नाही आला, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांसाठी लिफ्ट एरिगेशन नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आले, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तापी नदीचे कितीही पाणी वापरण्याची मुभा तिथल्या सरकराने दिली आहे. मध्यप्रदेशच्या सरकारने विविध धरण आणि छोट्यामोठ्या कालव्यांच्या माध्यमातून जितकं होईल तितकं तापी नदीचं पाणी आडवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र महाराष्ट्र सरकार या सगळ्या प्रकारात सफसेल फेल ठरले आहे. 

एकंदरित काय? तर ग्रामिण पातळीवरच्या ज्या समस्या आहेत, त्यांना तोंड देण्याचं काम तिथला प्रत्येक नागरिक स्वत: करताना दिसत आहे, त्यात सरकारचा कोणताच हस्तक्षेप नाहीच, त्याचबरोबर नेते मंडळींना लोकसेवेपेक्षा त्यांच्या खुर्चीची आणि सत्तेची लालसा खालच्या पातळीच्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाही, ही मोठी खंत आहे आणि ती दूर होण्यासाठी कोणी किती प्रयत्न करते, हे पाहाणे गरजेचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News