INDvsNZ हारल्यावर विराट म्हणतो, माझी आणि न्यूझीलंडची टीम खुप चांगली खेळली...

यिनबझ टीम
Thursday, 6 February 2020

टी - २० मालिकेमध्ये 5-0 ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडने एकदिवशीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चार विकेट्सने जिंकला आहे.

टी -२० मालिकेमध्ये 5-0 ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडने एकदिवशीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. न्यूझीलंडने तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चार विकेट्सने जिंकला आहे. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र आपल्या सहकाऱ्यांच्या कामगिरीवर खूष आहे. त्याच्या मते भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीच सोबत न्यूझीलंडने आज आपला चांगला खेळ दाखवून दिला.

 

भारताच्या 348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 11 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. रॉस टेलरने किवीकडून 84 चेंडूत 109 धावांची नाबाद खेळी केली. सामन्याच्या 46 षटकात दोन विकेट्स घेऊन भारताच्या जिंकण्याच्या आपेक्षा टिकून राहिल्या होत्या, मात्र त्या आपेक्षा संपुष्टात आल्याचे दिसून येते.

पहिल्या एकदिवशीय सामन्यात 'न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडून उत्तम फलंदाजीसह गोलंदाजी पाहाण्यास मिळाली. आम्हाला वाटले होते की 348 धावा ही चांगली धावसंख्या असेल, परंतु या सामन्यात टॉमने उत्तम डाव राखला आणि त्याने आमच्या हातात असलेला सामना आपल्याकडे वळवला, असे मत विराट कोहलीने पत्रकारांशी बोलताना मांडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News