‘टोटल धमाल’ची धूम 

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 February 2019

अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

सध्या हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिवर ७२ कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १६ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट शंभर कोटींचा आकडा पार करणार असे व्यापार विश्‍लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. शिवाय ‘टोटल  धमाल’मधील कलाकारांचा कॉमेडी सेन्स प्रेक्षकांना विशेष आकर्षित करणारा आहे. आता हा चित्रपट आणखी किती रेकॉर्डब्रेक कमाई करतो हे पाहायचंय. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News