ITI मधील टॉप ५ ट्रेड; शंभर टक्के मिळेल रोजगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 August 2020

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यात आल्या. राज्यात 417 शासकीय आणि 538 खाजगी संस्था आहेत, त्याद्वारे 79 प्रकारचे ट्रेड शिकवले जातात.

मुंबई :  आधुनिक जगात तंत्र शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले, तंत्रशिक्षण ही काळाची गरज बनली, त्यामुळे रोजगारासाठी तंत्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यात आल्या. राज्यात 417 शासकीय आणि 538 खाजगी संस्था आहेत, त्याद्वारे 79 प्रकारचे ट्रेड शिकवले जातात. त्यात काही ट्रेड हमखास रोजगार उपलब्ध करुन देतात असे टॉप फाईव्ह कोर्स सांगणार आहोत.

वीजतंत्री  Electrician   

हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा आहे. विज्ञान आणि गणित विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या कोर्समध्ये इलेक्ट्रॉनिक संबंधित सर्व विषयाची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व विषयाची माहीत मिळते. मुख्य म्हणजे विद्युत कंपनी लागणारे कौशल्य शिकवले जातात. त्याबरोबर घरगुती वापरणारे त्यांची दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक विषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना शिकवले जाते. दोन वर्ष प्रशिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अप्प्रेंडशिप कायदा 1961 नुसार एक वर्ष कंपनीत काम करण्यासाठी पाठविले जाते. या काळात विद्यार्थ्यांना थेट कंपनीत कामाचा अनुभव मिळतो त्यासोबत उदरनिर्वाहासाठी मानधन दिले जाते. हा कोर्स झाल्यानंतर उमेदवारांना शासकीय आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात प्रचंड संधी आहे. वीज निर्मिती केंद्र, महावितरण, महापारेषण, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, भेळ इत्यादी महत्वपूर्ण कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. संरक्षण, इस्रो, इंडियन आर्मी इत्यादी विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे. 

वायरमन Wireman

वायरमन कोर्सचा कालावधी दोन वर्षाचा आहे. दहावी पास किंवा नापास विद्यार्थी वायरमनसाठी प्रवेश घेऊ शकतात. वायरमन आणि इलेक्ट्रिसिटी कोर्स बहुसंख्य प्रमाणात सारखाचं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना मोठे केबल, वायरिंगची माहिती दिली जाते. त्याचबरोबर इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा विकवला जातो. विद्यार्थ्यांना विजेता परिचय, विद्युत उपकरणांची वायरींग करण्याचे अद्यावत ज्ञान शिकवले जाते. हा कोर्स झाल्यानंतर उमेदवारांना शासकीय आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात प्रचंड संधी आहे. वीज निर्मिती केंद्र, महावितरण, महापारेषण, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, भेळ इत्यादी महत्वपूर्ण कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. संरक्षण, इस्रो, इंडियन आर्मी इत्यादी विभागात नोकरीची संधी उपलब्ध आहे. 

मेकॅनिक मोटर वेहिकल MMV

या कोर्ससाठी दहावी पास ही पात्रता लागते, हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा आहे, पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना वाहनांच्या साहित्याची माहिती दिली जाते. दुसऱ्या वर्षी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हलके व जड वाहनांचे प्रत्यक्ष पार्ट दाखवले जातात. त्यात गिअर बॉक्स, असेंबली, व्हील असेंबली, व्हील अलायमेंट यांचे ज्ञान दिले जाते. गाडीची वायरिंग, कनेक्शन कसे द्यावे हे शिकवले जाते. एकंदरीत वाहनांची कार्यपद्धती देखभाल दुरुस्ती याची संपूर्ण माहिती या ट्रेनमध्ये शिकवली जाते. एसटी महामंडळ, रेल्वे, संरक्षण विभाग, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा विविध विभागांमध्ये शासकीय नोकरीची संधी उपलब्ध आहे

वेल्डर WELDER

हा कोर्स एक वर्ष कालावधीचा आहेत. दहावी पास नापास दोन्ही विद्यार्थ्यांना करता येतो. या कोर्समध्ये वेल्डिंगची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते त्याच बरोबर वेल्डिंग करण्याचे प्रत्यक्ष कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यात आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, धातु मिश्रित वेल्डिंग, धातूचे गुणधर्म, गॅस मेटल, अंडरवॉटर वेल्डिंग वेल्डिंगचे वेगवेगळे डिझाईन, वेल्डिंग करताना घ्यावयाची सुरक्षितता अशा सर्व विषयाचे उत्तम ज्ञान या ट्रेडमध्ये शिकवले जाते. देशातील बहुसंख्य उद्योगात वेल्डरची आवश्यकता आहे, त्यामुळे वेल्डरला मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध आहे. रेल्वे, भेळ, इंडियन ऑइलस इस्रो, डीआरडीओ, बाबा आटोमिक रिसर्च सेंटर, डिफेन्स अशा विविध ठिकाणी वेल्डरला नोकरी मिळू शकते

फिटर Fitter

हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा आहे. दहावी पास गणित आणि विज्ञान विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक, या ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी फिटींगची प्राथमिक माहिती दिली जाते. त्यात फिटिंगच्या संबंधित येणारे इतर ट्रेड उदाहरणात इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डिंग अशा ट्रेडची प्राथमिक माहिती दिली जाते त्याचबरोबर काम करताना व्यक्तीची सुरक्षितता कशी बाळगावी याची माहिती दिली जाते. दुसऱ्या वर्षी ड्रिल बनवणे, मोजमापे घेणे, कटिंग करणे, टूल्स अशा गोष्टी शिकवल्या जातात.धातू वरील प्रक्रिया त्यांची मोजमापणी, कटिंग, फिटींग असा एकंदरीत सर्व गोष्टी या ट्रेडमध्ये शिकवल्या जातात. रेल्वे, भारतीय संरक्षण विभाग, डिफेन्स शिपयार्ड अशा कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News