भारतातील ५ विद्यापीठे जी आहे जगात नामांकित... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

भारतात अशी काही विद्यापीठे आहेत ज्यांचं नाव जगातील उत्तम विद्यापीठांमध्ये गणलं जातं. आज आपण त्याच मुख्य पाच विद्यापीठांविषयी जाणून घेणार आहोत. 

नालंदा आणि तक्षशीला भारतातील नाही तर जगातील सर्वात जुनी ओळखली जाणारी अशी विद्यापीठे, ज्यांनी शिक्षणाची बीजे भारतामध्ये रोवली. आता ही दोन्ही विद्यापीठे अस्तित्वात नाही आहेत. मात्र भारताचं नाव अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर आहे. भारतात अशी काही विद्यापीठे आहेत ज्यांचं नाव जगातील उत्तम विद्यापीठांमध्ये गणलं जातं. आज आपण त्याच मुख्य पाच विद्यापीठांविषयी जाणून घेणार आहोत. 

  • कलकत्ता विद्यापीठ (१८५७) - भारतातील सर्वात मोठ्या नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेले हे विद्यापिठ आहे. कलकत्ता विद्यापीठला ब्रिक्समध्ये ५२ व क्रमांक मिळला आहेत तर संपूर्ण आशियामध्ये कलकत्ता विद्यापीठाचा १४९ व क्रमांक आहे. 

 

  • दिल्ली विद्यापीठ (१९२२) - भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ मानले जाते. ब्रिक्समध्ये या विद्यापीठचा ४६ व क्रमांक आहे तर आशियामध्ये ९१ व्या स्थानावर दिल्ली विद्यापीठचा नंबर आहे. दिल्ली विद्यापीठत एका वेळेला ३ लाक्षाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

 

  • इंडियन इंस्टीटयूट ऑफ सायन्स (IIS) : भारतातील टॉपचे विद्यापीठ म्हणून इंडियन इंस्टीटयूट ऑफ सायन्स ओळखले जाते. आशियामध्ये इंडियन इंस्टीटयूट ऑफ सायन्सचा ३४ व तर ब्रिक्स रँकिंगमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. 

  • बनारस हिंदू विद्यापीठ BHU : वाराणसीमध्ये स्थित असलेले हे विद्यापीठ नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग  फ्रेमवर्कनुसार हे विद्यापीठ पहिल्या 10 विद्यापीठांपैकी एक आहे. याची स्थापना १९१६ मध्ये झाली तर आशियातील सर्वात मोठे विद्यापीठ असून ३० हजाराहून अधिक विद्यार्थी अभ्यास करतात. 

  • जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (JNU) : मूल्यांकन व मान्यता परिषद (एनएएसी) ने केलेल्या सर्वेक्षणात हे भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे. नॅकने त्याला 4 पैकी 3.9 ग्रेड दिले होते. या विद्यापीठात 8,500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
     

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News