देशातील Top 5 डेन्टल कॉलेज; असा मिळवा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 June 2020
  • दात निरोगी ठेवण्यासाठी डेन्टीस्टची आवश्यकता आहे. डेन्टीस्ट होण्यासाठी देशातील टॉप पाच महाविद्यालय आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया यांची माहिती पाहणार आहोत.    

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या दातांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर वृद्धपकाळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बालपासून दातांची काळजी घेतली तर भविष्यात दात निरोगी राहतात. दात निरोगी ठेवण्यासाठी डेन्टीस्टची आवश्यकता आहे. डेन्टीस्ट होण्यासाठी देशातील टॉप पाच महाविद्यालय आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया यांची माहिती पाहणार आहोत.    

मौलान आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेन्टल सायन्स 

राष्ट्रीय रॅंकींग फ्रेमवर्क संस्थेच्या 2020 यादीनुसार दिल्ली येथील मौलान आझाद इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्स (MAIDS) महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक लागतो.  २००३ साली एमएआयडीएस महाविद्यालयाची स्थापना झाली. डेन्टल सर्जरीमध्ये पदवी पुर्व आणि पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध आहेत. बारावी आणि नीट परीक्षेच्या मार्कांवर प्रवेश दिला जातो. 

मणिपाल कॉलेज ऑफ डेन्टल सायन्स

राष्ट्रीय रॅंकींग फ्रेमवर्क संस्थेच्या 2020 यादीनुसार मणिपाल कॉलेज ऑफ डेन्टल सायन्स (MCODS) महाविद्यालयाचा प्रथम दुसरा लागतो. डेन्टल संबंधीत बीडीए, एमडीएस, प्रमाणपत्र, पदविका आदी कोर्सेस शिकवली जातात. बीडीएससाठी नीट आणि बारावी परीक्षांचे मार्क तर एमडीएससाठी नीट आणि बीडीएसच्या मार्कांवर प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर प्रमाणपत्र कोर्स पदवीच्या मार्कांवर अवलंबून असतो. 

डी. वाय. पाटील विद्यापीठ

राष्ट्रीय रॅंकींग फ्रेमवर्क संस्थेच्या 2020 यादीनुसार डी. वाय. पाटील विद्यापीठाचा (DYPV) तिसरा क्रमांक लागतो.  २००३ साली डी. वाय. पाटील विद्यापीठाची स्थापना झाली. एमडीएस अभ्यासक्रम शिकवले जातात. त्याच बरोबर बीबीए, एमबीए, बीएएमएस, एमबीबीएस, पीएचडी कोर्सेस उपलब्ध आहेत. एमडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी बीडीएस आणि नीट पीजी यांच्या मार्कांवर प्रवेश दिला जातो. 

सविता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल अॅड टेक्नीकल सायन्स (SIMATS)

राष्ट्रीय रॅंकींग फ्रेमवर्क संस्थेच्या 2020 यादीनुसार चन्नई येथील सविता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल अॅड टेक्नीकल सायन्स (SIMATS) महाविद्यालयाचा चौथा क्रमांक लागतो. महाविद्यालयात एमडीएस अभ्यासक्रम शिकवले जातात. त्याच बरोबर बी.एस्सी, एम. एस्सी, बीबीए, एमबीए, एमबीबीएस कोर्सेस उपलब्ध आहेत. एमडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी बीडीएस आणि नीट पीजी यांच्या मार्कांवर प्रवेश मिळतो. 

एबीएसएम इंस्टीट्यूट ऑफ डेन्टल सायन्स (ABSMIDS)

राष्ट्रीय रॅंकींग फ्रेमवर्क संस्थेच्या 2020 यादीनुसार बंगळूरू येथील एबीएसएम इंस्टीट्यूट ऑफ डेंटल सायन्स (ABSMIDS) महाविद्यालयाचा पाचवा क्रमांक लागतो. महाविद्यालयात बीडीएस, एमडीएस, पी. एचडी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. बीडीएससाठी बारावी आणि नीट परीक्षेच्या मार्कांवर प्रवेश दिला जातो. तर एमडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी बीडीएस आणि नीट पीजी यांचे एकत्रीत मार्क करुन प्रवेश यादी जाहीर केली जाते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News