आजची तरुण पिढी उद्याचं भविष्य घडवू शकते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • तरुणाईच्या सहिष्णूतेचा स्फोट होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली
  • मुंबई विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात अशी प्रतिक्रिया

देशात बेरोजगारीचा दर वाढतच आहे. त्यावर सरकारने वेळीच उपाय योजना केली नाही तर तरुणाईच्या सहिष्णूतेचा स्फोट होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात अशी प्रतिक्रिया दिली.

चुकीचे राजकीय निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे त्यात आर्थिक मंदीचा मोठा परिणाम झाला आणि नोकऱ्या कमी झाल्या. आजची तरुण पिढी उद्याचं भविष्य घडवू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकाराणात सहभागी व्हावे. राजकीय पक्ष आणि संघटना विद्यार्थ्यांना वेठीस धरुन त्यांचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काही विद्यार्थी संघटना प्रमाणिकपणे काम करतात. पण काही संघटना नावापुरती काम करतात. जेएनयुवर झालेला हल्ला विद्यार्थ्यांवरचा नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यला छेद देणारा आहे. जो पर्यांत चौकशी अहवाल जाहीर केला जाणार नाही, तो पर्यांत काही बोलणे उचित होणार नाही.
- प्रिया मोहिते,
मुंबई विद्यापीठ
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News