आजचा तरुण अविनाश जाधव...

महेश सोरटे, ठाणे
Saturday, 8 August 2020
  • कधी काळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना तडीपार केल जात होतं आणि आता अविनाश जाधव जो काम करेल जनता त्यांचा पाठीशी असेल ठाण्याला पुन्हा एकदा अविनाश जाधव ह्यांच्या मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबच दिसतात.

कधी काळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना तडीपार केल जात होतं आणि आता अविनाश जाधव जो काम करेल जनता त्यांचा पाठीशी असेल ठाण्याला पुन्हा एकदा अविनाश जाधव ह्यांच्या मध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबच दिसतात. गोरगरिबांसाठी आंदोलन करणे आणि त्यासाठी न्याय मागणे हा काय गुन्हा आहे काय आणि तो जर गुन्हा असेल तर आम्ही एकदा-दोनदा नाही तर हजार वेळा आम्ही गुन्हा करु महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीयन वर जर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असे आज काही चित्र बगायला मिळत होत. 
  
तुम्ही जो काही कोकण वासियासाठी निर्णय घेतला आहे त्यांचा सर्वच ठिकाण्याहुन तुमचे अभिनंदन केलं जात आहे. खुप मोठ कांम मार्गी लावल जात आहे. सरकारने फुकट युपी बिहारला व्यवस्था जाण्यासाठी त्यांची सोय केली. पण मराठी कोकणी माणसासाठी काहीच करताना दिसत नाही. पण त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खुप स्तुत्य पाऊल उचललं आहे. अविनाश जाधव ह्यांनी खुप मोठे पाऊल उचले आहे. गोरगरीबांवरील अन्याया विरोधात लढणाऱ्या अविनाश जाधव ह्यांच्यावर अश्या प्रकारे त्यांना अटकवण्याचा प्रयत्न करणे आणि प्रशासनावर दबाव टाकून त्याना जामीन मजूर न करणे हे चुकीचे आहे.  
       
पण अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आणि असत्यावर अखेर सत्याचा विजय झाला आणि मला असे वाटते की, आपण राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा जनता नेहमी तुमच्या पाठीशी असेल आज काल सर्वच जण सुशिक्षित झाले आहे त्यामुळे जनता जे काम करेल त्यांचा नेहमी त्यांच्या पाठीशी असेल. मी ऐवडेच बोलेल की, खेळ भारी खेळलात तुम्ही पण "प्लेयर" मात्र चुकीचा निवडलात...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News