आजचा कार्यकर्ता

सुनिल पवार
Monday, 3 June 2019

ते नड म्हणाले
मी नडलो
ते सहीसलामत सुटले
मी नाहक अडकलो  !

ते लढ म्हणाले
मी लढलो..
ते सत्ताधीश झाले
मी अडगळीत पडलो !

ते नड म्हणाले
मी नडलो
ते सहीसलामत सुटले
मी नाहक अडकलो  !

ते चढ म्हणाले
मी चढलो..
त्यांनी पाय खेचले
मी तोंडघशी पडलो  !

ते पेट म्हणाले
मी पेटलो..
त्यांनी पोळी शेकली
मी राख झालो !

ते राजा म्हणाले
मी क्षणात हुळहुळलो..
त्यांनी केलेला भ्रष्टाचार
मी सहज विसरलो..!!
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News