आज एक जण बोलला मला

अशोक पवार
Thursday, 20 June 2019

आज एक जण बोलला मला
अरे कविता करतोस ना ! मग
माणूस थंड करणाऱ्या नको
तर माणूस पेटून उठून बंड
करणाऱ्या कविता कर....

 ओढ की व्यवस्थेवर ताशेरे 
आणि प्रस्थपित विरोधात चालावं तुझा 
लेखणीचा आसूड.....
घेऊ दे तुझ्या शब्दांना अन्याया 
विरोधात सूड....

पेटव ती शब्द रुपी मशाल
बिनधास्त होऊन लिहत रहा खुशाल
होऊ दे तुझ्या शब्दांनी त्यांचा 
ही दाह...
होरपळून जाऊ दे त्या 
मशाल रुपी शब्दांनी
त्यांचा ही देह.....

आज एक जण बोलला मला
अरे कविता करतोस ना ! मग
माणूस थंड करणाऱ्या नको
तर माणूस पेटून उठून बंड
करणाऱ्या कविता कर....

 ओढ की व्यवस्थेवर ताशेरे 
आणि प्रस्थपित विरोधात चालावं तुझा 
लेखणीचा आसूड.....
घेऊ दे तुझ्या शब्दांना अन्याया 
विरोधात सूड....

पेटव ती शब्द रुपी मशाल
बिनधास्त होऊन लिहत रहा खुशाल
होऊ दे तुझ्या शब्दांनी त्यांचा 
ही दाह...
होरपळून जाऊ दे त्या 
मशाल रुपी शब्दांनी
त्यांचा ही देह.....

तुझी कविता नुसतीच वेदना 
मांडणारी नको
तर त्या वेदनेला वाचा फोडणारी  कर
त्या शब्दांना लढणारी भवानी 
तलवार कर ...तलवार कर..!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News