आज 'जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृती दिन'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 April 2019

'ऑटिझम' म्हणजे नेमके नक्की काय? असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आजही अगदी सहजपणे निर्माण होतो. अर्थात, 'जावे त्याच्या वंशी तेंव्हा कळे...' तोवर, याबाबतची एकूणच इतरांच्या ठायी याबाबत असलेली 'अनभिज्ञता' हे देखील, या मागचे एक मुख्य कारण असू शकते. असो...तर, 'स्वमग्नता' (ऑटिझम) हा एक प्रकारचा 'मनोविकार' असून, याला 'सायकोन्यूरॉलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर' किंवा इंग्रजी मध्ये याला 'ऑटिझम' असे देखील म्हटले जाते. 

ही एक प्रकारची 'गुंतागुंतीची असणारी मानसिक जन्मस्थ अवस्था' असून, तो 'रोग' नाही. याचा शोध 'लिओ केनेर' यांनी सन १९४३ मध्ये लावला. 'स्वमग्नावस्थेतील व्यक्ती आपल्याच विश्वात व विचारात रममाण असतात. संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही, म्हणून त्यावर ते प्रतिक्रिया देत नाहीत. स्वमग्नता हा एक विकार जरी म्हटला तरीदेखील, हे 'लक्षण' म्हणजेच, 'पूर्ण विकार' असे देखील म्हणता येत नाही. आणि म्हणूनच, ही एक 'मानसिक गुंतागुंतीची अवस्था' आहे, असे म्हटले जाते. 'मनोविकारतज्ञ', 'बालरोगतज्ञ' यांचा सल्ला यासाठी महत्वाचा ठरतो.

अशा 'स्वमगनावस्थेतील' मुलांच्या भाषेवर तसेच, इतर मूलभूत विकासावर देखील याचा परिणाम होतो. मुख्यतः त्यांची भाषेची वृद्धी खुंटते. बाह्य जगताशी देखील यांचा जणूकाही संबंध नसतो. त्यातही, सर्वसाधारणपणे, बालकांच्या समस्येकडे पालकांकडून व इतरजणांकडूनही काही कारणास्तव, कदाचित अपुरे लक्ष, तसेच बालकांच्या बाबतीतले, त्यांच्या वागण्या - बोलण्याच्या सवयीं बद्दलचे पारंपारिक प्रचलित असणारे गोड गैरसमज, यामुळे देखील अशा मुलांचा नेमका शोध घेणे व त्यांची सुयोग्य वेळी, त्वरित सुयोग्य तपासणी व उपचार सुरू करणे, ही देखील एक खूप गंभीर समस्या आढळून येत आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News