महिलांमध्ये थकवा एक आजार ठरू शकतो?

भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
Sunday, 9 June 2019

रेणुका, माझी पेशंट. वय ४८. माझी खूप जुनी आणि विश्‍वासू पेशंट. माझ्या कन्सल्टिंगमध्ये आज येऊन बसताच पहिलं वाक्‍य अगदी ऊपहासाने बोलली. ते म्हणजे, ‘आजकाल मला फारच थकायला होतं’. हे सर्व ती तिच्या सुनेसंबधी बोलत होती. हल्ली प्रत्येक जणांच्या तोंडून हे वाक्‍य सहज आणि सतत ऐकू येते. अनाहूतपणे काळजी करता-करता रेणुका जणू तिच्या थट्टेच्याच  सुरात बोलून गेली. 

तर हा सततचा थकवा, हा केवळ आविर्भाव असावा किंवा खराखुरा नव्याने समजलेला आजार तर नव्हे ना! असा हा आजार बालपण हरवणारा, तरुणाईला मरगळवणारा आणि म्हातारपण असह्य करणारा महाराक्षसच जणू!

आळस, दमणे आणि थकवा या वेगवेगळ्या अवस्था आहेत. यातील फरक ओळखणे हे उपचारांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या बोलीभाषेत अनेक गोष्टी आपण थकवा म्हणून गृहीत धरतो.  आळसात आपली क्रियाशक्ती पुरेशी असते; परंतु इच्छाशक्ती कमी पडते.   

दमणे ही तात्पुरती अवस्था असते; कारण पुरेशी विश्रांती घेतल्यास ती पूर्ववत क्रियाशीलतेकडे वळते.  परंतु, थकण्यामध्ये आणि तेही वारंवार वाटण्यात याच क्रियाशीलतेचा शक्तिपात होतो आणि इच्छा असूनही पुरेशा प्रमाणात क्रिया करता येत नाहीत; कारण यामध्ये एका किंवा अनेक स्नायूंची क्षमता कमी होते आणि म्हणूनच थकव्याबद्दल विस्तृत माहिती तुम्हापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न.

भारतात ३० ते ६० वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. याला आपण इंग्रजीमध्ये ‘फटिग’ असे संबोधतो. ही व्याधी अत्यंत गंभीर असून, ५० टक्के दैनंदिन कार्याची क्षमता कमी करू शकते. ७०-८० टक्के महिलांना हा त्रास जाणवतो आणि त्या वेगवेगळ्या स्वरूपात याचा अनुभव सर्रास घेत असतात. डोकेदुखी, नीट व गाढ झोप न लागणे किंवा स्नायूंना सतत गोळे येणे किंवा त्याचे दुखणे, अशा अनेक गोष्टी थकव्याचे प्रतिबिंबित असते. थकवा किंवा फटिग साधारण पुढील तीन वयोगटांतील महिलांमध्ये दिसून येते. 

गर्भधारणा म्हणजेच प्रेग्नन्सीचा कालावधी

  • बाळंतपणानंतरचा कालावधी
  • रजोनिवृत्तीनंतरचा कालावधी
  • या प्रामुख्याने त्रास देणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातील प्रमुख टप्पे.
  •  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News