दररोज एकसारखी डाळ खाऊन कंटाळलात; ४ प्रकारे तडका द्या, रोज नवीन चव घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

दररोज डाळीला सारखा तडका दिल्यामुळे वेगळ्या प्रकारची डाळ खाण्याची इच्छा निर्माण होते, त्यामुळे आम्ही चार प्रकारे डाळीला तडका देण्याच्या पद्धची सांगणार आहोत,

डाळ हा जेवनामधला प्रमुख पदार्थ आहे. संपूर्ण देशात दाळ बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. मात्र प्रत्येकाच्या जेवणामध्ये डाळ आणि भात हा महत्त्वाचा पदार्थ नक्की असतो. डाळीला शिकजून तडका दिला जातो. तडका देण्याच्या चार पद्धती आहेत. त्यामुळे खवय्यांना दररोज डाळीची वेगवेगळी चव घेता येणार आहे. दररोज डाळीला सारखा तडका दिल्यामुळे वेगळ्या प्रकारची डाळ खाण्याची इच्छा निर्माण होते, त्यामुळे आम्ही चार प्रकारे डाळीला तडका देण्याच्या पद्धची सांगणार आहोत, त्यामुळे डाळीची चव बदलेल आणि वेगळा स्वाद चाखता येईल. 

१. सांबर दाल तडका 

दक्षिण भारतात सर्वाधिक लोकप्रिय डाळीचा प्रकार सांबर दाल तडका आहे. ही रेसिपी स्थानिक मसाले आणि तेथील तेलबिया यांना एकत्र करु बनवली जाते. सांबर दाल तडका बनवण्यासाठी सरसोबिया, कडीपत्ता, चिंच, सांबर मसाला आणि लाल मिरची इत्यादी साहित्य लागते. तेलामध्ये वरील पदार्थ मिसळून डाळीला फोडणी दिलास सांबर तडका तयार होतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे.

२. जीरा- हींग तडका 

कडधान्य उडीद, मुग, मसूरी इत्यादी दाळीला जीरा हींग तडका दिला जातो. तेलामध्ये एक चम्मच हिंग, जीर, लाल मिरची आणि आद्रक टाकून व्यवस्थिक शिजू द्या, त्यानंचर शिजवलेली दाळ तकड्यात मिश्र करा. थोडावेळ हे मिश्रण उकळू द्या. जीरा- हींग तडका तयार होईल. जेवनात एक वेगळा स्वाद येईल. 

३. धाबा स्टाइल तडका 

हा तडका उत्तर भारतीय लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. डाळीला मोठं मोठं रगडून घ्याव.. तेलात जिरा, हिंग, धनिया पावडर, लाल मिरची, कांदा, टमाटर, आद्रक, लसुन आणि हिरवी मिरची एकत्र तळवून घ्यावे. त्यानंतर यामध्ये रगडून घेतलेली गरम गरम डाळ मिश्र करावी. त्यात तुप किंवा मख्खन मिसाळावे, त्यासोबत डाळीला स्वाद येण्यासाठी धनिया पत्ते टाकावे. अशाप्रकारे ढाबा धाबा स्टाइल तडका तयार होईल. 

४. साधा कलोंजी तडका 

साधा कलोजी डाळ तडका बनवण्यासाठी कलोंजी मिरची पावडर, टमाटर आणि शिजवून घेतलेली डाळ. एका भांड्यामध्ये सरसो तेल टाकून त्यात टमाटर मिरची आणि कलोजी मिरची पावरड टाकून शिजवून घ्या. थोड्यावेळाने त्यात डाळ मिसळून तडका द्यावा अशाप्रकारे साधा कलोजी डाळ तडका तयार होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News