मानसिक त्रासामधून बाहेर पडण्याच्या काही टिप्स...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

मानसिक त्रासामुळे आपण व्यसनांच्या अधीन होऊन जातो. स्वतःवरचा ताबा निघून जातो, आणि याचा त्रास आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही सहन करावा लागतो. तर अशावेळी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी अनेक पुस्तकांचा सहारा आपण घेतो.

अनेकवेळा अनेक कारणांमुळे आपल्या आयुष्यात अश्या काही घटना घडत जातात, ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी काय करावे हे सहसा समजत नाही. या मानसिक त्रासामुळे आपण व्यसनांच्या अधीन होऊन जातो. स्वतःवरचा ताबा निघून जातो, आणि याचा त्रास आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही सहन करावा लागतो. तर अशावेळी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेण्यासाठी अनेक पुस्तकांचा सहारा आपण घेतो. मात्र आज आपण मानसिक त्रासातून कसे बाहेर पडायचे याच्या महत्वपूर्ण टिप्स जाणून घेणार आहोत. 

१. दोन मिनिट नियम चा वापर करा. 

जेव्हा एखादा कठीण प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या विरुद्ध लढणे हे आपल्या हातात असते. अशावेळी आपण या 'दोन मिनिट' नियमाचा वापर करू शकतो. यामध्ये करायचे एवढेच आहे की, उभा ठाकलेल्या प्रसंगाच्या चांगल्या व वाईट या दोन्ही बाजुंचा विचार करा. जेणेकरून तुमच्या समोर दोन पर्याय समोर उभे राहतील ज्याच्या जोरावर तुम्ही त्या प्रसंगाचा सामना करू शकता. 

२. नकारात्मक विचार करणे टाळा. 

जेव्हा कठीण प्रसंग आपल्या समोर येतात, त्याचबरोबर त्याच्याशी निगडित नाकारात्मक विचार देखील आपल्या मनात येतात. आणि या वेळी आपण अधिक घाबरून जातो तर, या परिस्थितीमध्ये आपल्याला मनामध्ये नकारात्मक विचार येणे टाळायचे आहे.

३. जबाबदारी घ्या. 

चुकी जर तुमच्या हातून झाली असेल तर त्या चुकीची जबाबदारी तुमची तुम्ही घ्या. कोणावरही ढकला ढकली करू नका. जर तुम्ही असं केलं तर तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी हात पुढे करणार नाहीत. जबाबदारी घेतला तर अनुभव मिळतो व सहकारी देखील तुम्हाला सांभाळून घेतात. त्यामुळे जबाबदारी घ्यायला शिका. वेळप्रसंगी तीच आपल्याला मदत करते हे विसरू नका. 

४. एकाच वेळेला अनेक गोष्टी करणे टाळा. 

तुम्ही जर स्वतःला बहुरूपी समजत असला तर तो खूप मोठा गैसमज आहे. कारण माणसाला एकाच वेळेला एकच काम नीटपणे करता येते, आणि अशावेळी जर तुम्ही खूप कामे स्वतः करायला घेतला तर तुमचा गोंधळ उडू शकतो. एकही काम नीटपणे होत नाही व शेवटी काम न झाल्यास आपण मानसीक त्रास घेतो. म्हणून एकाच वेळेला एकच गोष्टी करा. यावेळी काम पूर्ण झाल्यास आपल्याला मानसिक आनंद देखील मिळतो. 

५. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 

कठीण प्रसंगामध्ये आपण मनातून खचून जातो, त्या प्रसंगांव्यतिरिक्त कोणताही विचार मनात येत नसतात. अगदी आपल्याला काय करायचे होते हे देखील विसरून जातो. म्ह्णून अशावेळी आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. आपल्या ध्येयाबाबत सकारात्मक विचार केल्यामुळे त्या प्रसंगात आपण धीरगंभीरपणे उभे राहतो. 

या टिप्सचा आपण आपल्या जीवनात अवलंब केला तर नक्कीच आपल्याला खूप फायदा होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News