नवरात्री विशेष : ट्रेंडी ड्रेस आणि मेकअप टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 September 2019

नवरात्रीचा सण जवळ आल्यावर मुलींची लगबग सुरु होते, आपण सगळ्यांमध्ये कसे सुंदर दिसू याकडे सगळ्या मुलींचा कल असतो. नवरात्री म्हणले तर सगळीकडे रोषणाई व रंगीबेरंगी असे वातावरण सगळीकडे दिसून येते. मुलींना त्यांच्या कपड्यांइतकाच मेकअपही महत्वाचा असतो.  त्यात गरबा किंवा दांडियासाठी मुली ह्या सजून-थटून खेळायला जात असतात.  त्यासाठी मुलींना काही भन्नाट अश्या व ट्रेंडी मेकअपच्या टिप्स घेऊन आलो आहोत.   

स्मोकी आईज व न्यूड लिप्स-(smokey eyes and nude lips):
स्मोकी आईजचा सध्या ट्रेंड आहे. जर तुम्हाला आपले डोळे रेखीव करायचे असतील किंवा, तुमचे डोळे आकर्षक दिसावेत असे वाट असेल तर, तुम्ही स्मोकी आईज मेकअप करू शकता.

स्मोकी आईजसाठी तुम्ही सर्वप्रथम ब्लॅक रंगाच्या आय लायनर ने डोळ्याच्या पापणीवर एक अखिल रेष काढून घ्या व ती स्मज करा म्हणजेच जरा बोटांच्या सहाय्याने पसरवा. अजून बोल्ड लुक हवा असल्यास आई शॅडोचा वापर करून ते देखील सम्ज करा.  त्यासोबतच न्यूड लिपस्टिकचे कलर वापरा म्हणजेच सॉफ्ट ब्रावून, सॉफ्ट पिंक, सॉफ्ट रेड अश्या प्रकारे तुम्ही तुमचा मेकअप करू शकता. 

नवरात्रीसाठी ट्रेंडी ड्रेस :
नवरात्रीमध्ये मुलींना गरब्याला किंवा दांडियासाठी जाताना काय परिधान करावे असा प्रश्न पडतो तेव्हा त्यांचा जास्त काळ घागरा भरजरी चनिया चोळी, जाड सड्या न घालता साधे हलके व आकर्षक असे कपडे परिधान करण्याकडे जास्त कल असतो.

 त्यामुळे कुर्ती, टॉप, चुडीदार या रोजच्या वापरातील पोषाखांकडेच तरुणीं ह्यावेळेस जास्त आकर्षित होत आहेत. तरुणीची ही गरज लक्षात घेत यंदा बाजारातही अशाच पद्धतीच्या पोषाखांनी गर्दी केली आहे. यामध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांचे कुर्ती, त्यावरील आरशांची नक्षी, हँडप्रिंट केलेले टॉप यांच्यात वैविध्य आहे.

पारंपरिक पोषाखांच्या तुलनेत कमी खर्चिक असणारे हे प्रकार कामाच्या ठिकाणी घालणे सहज शक्य आहे. ‘पारंपरिक वस्त्रांपेक्षा सोयिस्कर ठरणाऱ्या पेहरावाकडे अनेकींचा ओढा आहे. अशा साध्या वस्त्रांतही खूप वैविध्य असल्याने तरुणी टॉप्स, प्रिंटेड ओढण्या, डिझायनर कुर्ती यांची खरेदी करत आहेत. प्रिंटेड जॅकेट, प्रिंटेड धोती आणि टॉपस 

अश्याप्रकारे तुम्ही तुमचा लुक आकर्षक असं करू शकता तुमचा मेकअप आणि ड्रेस हे कसे खुलून दिसतील यासाठी ट्रेंडी मेकअप आणि ड्रेस नक्की ट्राय करा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News