लिव्ह-इन रिलेशनशिपध्ये राहण्यापूर्वी या गोष्टी नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

लग्न न करता एकमेकांच्या सहमतीने राहणे अर्थातच लिव्ह-इन रिलेशनशिप होय. एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा पर्याय योग्य असला तरी लिव्ह-इन रिलेशनशिपध्ये राहण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहेत.

लग्न न करता एकमेकांच्या सहमतीने राहणे अर्थातच लिव्ह-इन रिलेशनशिप होय. एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा पर्याय योग्य असला तरी लिव्ह-इन रिलेशनशिपध्ये राहण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहेत.

मैत्रीच्या रूपात वेळ घालवावा
लिव्ह-इन रिलेशनपूर्वी मैत्रीच्या रूपात वेळ घालवावा आणि नंतर जुळत असल्यास पुढचं पाऊल उचलावं. मनात जरा ही शंका असल्यास नात्याला अजून वेळ द्या आणि मग ठरवा. आपल्या पार्टनरचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. पार्टनरचे भावना आणि मूडबद्दल कल्पना असावी. 

वायफळ बडबड करू नये
अनेकदा क्रोधात व्यक्ती वाटेल ते बोलत सुटतो परंतू जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कारण वेळ निघाल्यावर देखील त्या गोष्टी मनातील एखाद्या कोपर्‍यात दाटून राहतात. राग आल्यावर हे लक्षात ठेवा की एकमेकावर विश्वास असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला. नातं म्हटलं की थोडा तर ताण येणारच. याने नाते मजबूत होतात परंतू लिव्ह-इन रिलेशनमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यास रागात वायफळ बडबड करू नये. 

खर्च वाटून घ्या
हल्ली महागाई इतकी आहे की चांगल्या लाइफस्टाइलसाठी पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. एकट्यावर भार टाकल्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. अशात रिलेशनमध्ये पडण्यापूर्वीच खर्च वाटून घेणे योग्य ठरेल.

मानसिक तयारी असावी
अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी असली पाहिजे. अनेकदा आपल्याला पार्टनरच्या काही सवयी आवडणार नाहीत तरी त्यावर वाद न घालता समाधान काढणे योग्य ठरेल. काही गोष्टी दुर्लक्ष देखील कराव्या लागतील. तसेच समाजाला सामोरा जायची पण तयारी असली पाहिजे. कारण जग किती जरी आधुनिक झालं असलं तरी टोकणारे आणि अशा रिलेशनला नकारणार्‍यांची अजूनही कमी नाही.

कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे
आपण रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरचा कल्पना नसलेला खरा चेहरा दिसू लागला तर इमोशन्सवर ताबा ठेवून त्यातून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी लागेल. ठराविक गोष्टी पलीकडे मुद्दे जात असल्यास किंवा विपरित परिस्थिती निर्माण होत असल्यास दुसर्‍या लाईफसाठी तयार राहावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News