झणझणीत जिलेबी चॉट; जाणून घ्या रेसिपी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

जीलेबी ही झणझणीत असू शकते यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. दही, हिरवी मिरची, गोड चटणी आणि विविध मसाल्यामध्ये भाजलेली जिलेबी चॅट कशी बनवावी हे सांगणार आहोत.

जिलबी म्हटलं की डोळ्यासमोर येतं गरम गरम आणि स्वादिष्ट जिलेबी मात्र जीलेबी ही झणझणीत असू शकते यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. दही, हिरवी मिरची, गोड चटणी आणि विविध मसाल्यामध्ये भाजलेली जिलेबी चॅट कशी बनवावी हे सांगणार आहोत. झणझणीत मसालेदार जिलेबी चॅट रेसिपी कशी बनवायची जाणून घेऊया.

साहित्य 

एक किलो मैदा, 200 ग्राम उडदाच्या डाळीचे पीठ, अर्धा चमच तूप, दीड चम्मच बेकिंग सोडा, अर्धा चमचा फूड कलर, दोन चम्मच पुदिन्याची चटणी, दोन चम्मच चिंचेची चटणी, तीन चम्मच दही, एक चुटकी सिंधी लोन मिठ, पिवळी मिरची पावडर, एक चुटकी चाट मसाला, गारमींगसाठी मायक्रो ग्रीस, दोन उघडलेले आलू त्याच चना मिक्स इत्यादी साहित्य आवश्यक आहे.

कृती

एका पातेल्यामध्ये मैदा, बेकिंग सोडा मिक्स करा, या मिश्रणात तुप मिसळा. मिश्रण गाढ बनवण्यासाठी त्यामध्ये उडदाच्या डाळीचे पीठ मिसळा, त्या पिठामध्ये थोडे पाणी टाका. या मिश्रणाला व्यवस्थित एकत्र करून घ्या. थोडं जाडसर होऊ द्या आणि तीस मिनिटं या मिश्रणाला वेगळा ठेवा.

दुसरीकडे मध्यम आचेवर कढईत तेल गरम करा. एका कपड्यांमध्ये हे मिश्रण बांधून घ्या. कपड्याला खाली छोटस छद्र पाढा. त्या छद्रातून तेलामध्ये गोल जिलेबी बनवा. जिलेबीचा आकार गोल येण्यासाठी मधून बाहेर अशा प्रकारचा राऊंड बनवा. जिलेबी कुरकुरीत होण्यासाठी थोडा वेळ जास्त भाजू द्या. ही भाजलेली जिलेबी एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात पुदिना चटणी. चिंचेची चटणी, एक चुटकी मिठ, पिवळी मिरची पावडर आणि गरम मसाला टाका. हे सर्व मिश्रण गोड दही, आलू आणि चना यात टाकून मायक्रो ग्रिटमध्ये मिसळून घ्या. झणझणीत जिलेबी चार्ट अशाप्रकारे तयार होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News