कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी टिकटॉकनी दिले 5 कोटी; पोलिसांना एक लाख मास्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020

टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून "कोव्हिड-19' विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही दिली.

मुंबई : टिकटॉक कंपनीने कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली. टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून "कोव्हिड-19' विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही दिली.

मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. टिकटॉक युजर्सपर्यंत कंपनीने कोव्हिड-19 संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम करण्यास सुरुवात केली आहे. कोव्हिड-19 लढ्यात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ऍपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याचे आवाहन करण्यात येते, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News